Saturday, April 27, 2024
Homeनगरकेंद्रीय निवासी आश्रम शाळेत दहावीच्या परीक्षा सुरळीत पार

केंद्रीय निवासी आश्रम शाळेत दहावीच्या परीक्षा सुरळीत पार

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले तालुक्यातील कोतूळ परीक्षा केंद्र अंतर्गत येथील केंद्रीय निवासी आश्रम शाळेत दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती मुख्याध्यापिका सुप्रिया भाऊसाहेब गीते यांनी दिली.

- Advertisement -

या परीक्षा केंद्रावर 15 मार्चपासून परीक्षा दहावीची परीक्षा सुरू झाली होती आज 4 मार्च रोजी दहावीच्या परीक्षेचा अखेरचा पेपर पार पडला. कोविड 19 नियमांचे पालन करत या परीक्षा सुरळीत पार पडल्या कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत दहावीच्या तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपकेंद्र प्रमुख म्हणून सुप्रिया गीते, परीक्षा प्रमुख म्हणून एस. डी. लांडगे, एस. एस. वाकचौरे, एस. डी. आंबरे, आर. एन. देठे यांनी काम पाहिले.

कोविड 19 चे शासकीय नियमांचे पालन करून तणावमुक्त वातावरणात या परीक्षा पार पडल्या. या केंद्रीय निवासी आश्रम शाळेत आदिवासी मुला मुलींना पहिली ते दहावीपर्यंत सर्व निवासी शैक्षणिक सर्व सोयी सुविधा मोफत दिल्या जात असल्याचे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब गीते यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या