Saturday, April 27, 2024
Homeनगरकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बाभळेश्वर दूध संघास भेट

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बाभळेश्वर दूध संघास भेट

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

बाभळेश्वर येथील श्रीरामपूर दूध जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघास केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट दिली.

- Advertisement -

ना. दानवे प्रवरानगर येथे कार्यक्रमास आले असता त्यांनी दूध संघास भेट दिली. त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधिर रावसाहेब म्हस्के यांनी केले. ना. दानवे यांनी दूध संघाची सखोल माहिती घेतली. दूध संकलन तसेच वितरण व आर्थिक धोरणाच्या बाबतीत दूध संघास सहकार्य करण्याचे अश्वासन यावेळी ना. दानवे यांनी दिले.

याप्रसंगी योगेश नामदेव म्हस्के, श्री साईबाबा मल्टीस्टेट सह. दूध संघाचे अध्यक्ष नकुल विलासराव कडू, संघाचे महाव्यावस्थापक एम. एस. पवार, संघाचे व्यवस्थापकीय सल्लागार माणिकराव लहामगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईजाज तांबोळी, संघाचे पर्सनल ऑफिसर बबनराव चव्हाण, यांचेसह संघाचे अधिकारी, दूध उत्पादक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या