Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादेत होणार केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र

औरंगाबादेत होणार केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र

औरंगाबाद – Aurangabad :

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (सीजीएसएच) सुरू होणार आहे.

- Advertisement -

हे केंद्र औरंगाबाद येथे व्हावे, यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वारंवार केंद्राकडे पाठपुरावा केला.

त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी औरंगाबादेत हे केंद्र सुरू करण्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यासंदर्भात सांगितले की, महाराष्ट्र राज्यात 4 ठिकाणी असे केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र आहेत.

यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथे लोकांना उपचारासाठी जावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय कर्मचारी, माजी सैनिक, स्वतंत्र सैनिक, संरक्षण विभागाचे कर्मचारी, निवृत्त वेतनधारक आहे.

त्यामुळे हे केंद्र औरंगाबादेतही व्हावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. ती आता मान्य होणार असल्याने हजारो केंद्रीय कर्मचारी व वयोवृध्द नागरिकांना उपचारासाठी 200 ते 400 किलोमीटर जावे लागणार नाही.

हा पाठपुरावा केल्यामुळे खैरे यांचे नागरिकांनी आभार मानले. या केंद्रामुळे दैनंदिन उपचाराबरोबर करोना तपासणी, उपचार आणि निदान करणे सोपे जाईल. तसेच केंद्रीय कर्मचारी यांची होणारी धावपळ थांबणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या