Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकेंद्र सरकारची ट्विटरला नोटीस

केंद्र सरकारची ट्विटरला नोटीस

दिल्ली l Delhi

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्विटर हे सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संसदेनं लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केलं होतं. त्यातच ट्विटरने नकाशात लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला. यामुळे केंद्र सरकारनं ट्विटरला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली असून नोटीसला उत्तर देण्यासाठी ट्विटरला पाच दिवसाचा वेळ देण्यात आला आहे.

- Advertisement -

चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? अशी विचारणा करत पाच दिवसात इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

अमित शाह यांचा ट्विटर प्रोफाईल फोटो गायब ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटरवरील अकाउंटच्या प्रोफाईल फोटोमध्ये अचानक झालेला बदल पाहता सर्वजणांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कारण त्यांचा प्रोफाइल फोटो काही वेळासाठी गायब झाला होता. कारण अमित शहा यांचा जो फोटो प्रोफाईलवर होता तो कॉपीराइट असल्याचा कोणीतरी दावा केला गेला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा प्रोफाइल फोटो रिस्टोर करण्यात आला होता. यावर आता ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ट्विटरने अमित शहा यांच्या ट्विटर अकाउंटबद्दल असे म्हटले आहे की, आमच्या काही जागतिक पॉलिसीनुसार त्यांच्या अकाउंटवर Inadvertent error येत होता. त्यामुळे अकाउंट तात्पुरते लॉक करण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर ही समस्या पूर्ववत होत त्यांच्या अकाउंटवरील फोटो रिस्टोर करण्यात आल्याचे ट्विटरच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या