Friday, April 26, 2024
Homeनगरछात्रभारती व राष्ट्रसेवा दलाचा संगमनेरात मोर्चा

छात्रभारती व राष्ट्रसेवा दलाचा संगमनेरात मोर्चा

संगमनेर |प्रतिनिधी|Sangmner

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास छात्रभारती व राष्ट्रसेवादल संघटनेने विरोध केला

- Advertisement -

असून केंद्रातील भाजप सरकारविरोधात संगमनेर प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्रीय कृषी विधेयक बिल रद्द करावे, या मागणीचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

छात्रभारती व राष्ट्रसेवादलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

निवेदनात छात्रभारती व राष्ट्रसेवा दलाने म्हटले आहे की, सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उद्ध्वस्त करणारे कृषी विधेयक संसदेमध्ये मंजूर करून अन्याय केलेला आहे. यामुळे पुढील काळात शेतकर्‍यांची भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. भांडवलदार व बडे व्यावसायिक यांचा अप्रत्यक्ष मार्गच सरकारने खुला केलेला आहे.

सदर विधेयकाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी नवीन करत असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारची मक्तेदारी निर्माण होणार आहे. तसेच यापूर्वीही शेतकरी मार्केट बाहेर आपल्या शेती मालाची विक्री करतच होते. पण कोणताही विचार न करता काहीतरी नवीन बिनकामाचे उद्योग करत केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्वच संपवून टाकत आहे.

त्यामुळे नियंत्रण संपणार आहे. कंत्राटी शेती यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. सदर तीनही विधेयके केंद्र सरकारने संख्याबळच्या जोरावर रेटून बेकायदेशीरपणे पास करून घेतली आहेत. खरंतर हमी भाव व स्वामिनाथन आयोग या गोष्टी महत्त्वाच्या असताना भांडवलदारांच्या हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदर विधेयक शेती आणि शेतकरी यांच्या विरोधातील असून सदर विधेयकास आम्ही शेतकर्‍यांची मुलं- मुली छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने विरोध करतो व केंद्र सरकारचा या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करतो, केंद्र सरकारने हे विधेयक त्वरीत मागे घ्यावे, अन्यथा छात्रभारतीच्यावतीने लोकशाही आणि संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल.

आंदोलनात राष्ट्रसेवादलाचे महाराष्ट्र राज्य सचिव राजा कांदळकर, छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, संघटक प्रविण गुंजाळ, संदीप आखाडे, स्वप्नील मानव, तुषार पानसरे, गणेश जोंधळे, राधेश्याम थीटमे, राहुल जर्‍हाड, दीपाली कदारे, हर्षल कोकणे, मयूर पोखरकर, आकाश पानसरे, अश्विन गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या