Thursday, April 25, 2024
Homeनगरकेंद्र व राज्य शासनाने साखर व इथेनॉलबाबत धोरणात्मक दर ठरवावेत : बिपिन...

केंद्र व राज्य शासनाने साखर व इथेनॉलबाबत धोरणात्मक दर ठरवावेत : बिपिन कोल्हे

कोपरगाव (प्रतिनिधी)

दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात होत असल्याने राज्यात व देशात उसासह साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे. त्यात मागील हंगामातील ९० लाख टन साखर गोदामात अतिरिक्त असून चालू हंगामात ३१५ लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने आगामी पाच वर्षांच्या साखर उद्योग स्थैर्यासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन साखरेसह इथेनॉल उत्पादनास कायमस्वरूपी ठरवून खुल्या दर अर्थव्यवस्थेत सहकार टिकवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.

- Advertisement -

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली. त्यात ते बोलत होते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी मागील हंगामात कारखान्याने ऐतिहासिक गाळप केल्याबद्दल सर्व सभासद, आजी माजी संचालक, कारखाना व्यवस्थापनाचे जाहीर अभिनंदन करत कौतुक केले.

या प्रसंगी कारखान्याचे संचालक विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, लेखापाल एस. एन. पवार, प्रवीण टेमगर, आदी उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त सचिव तुळशीराम कानडे यांनी वाचले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात एक मुखाने मंजूर करण्यात आले.

दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात रुग्णांना दिलासा देऊन त्यांच्यासाठी ५०० खाटांचे रुग्णालय उभारून मोफत उपचार केल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचा ऐनवेळच्या विषयात भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, दिलीप बनकर आदींनी सत्कार केला. बिपिन कोल्हे म्हणाले, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देत मागील विश्वस्त मंडळाने निळवंडे शिर्डी व कोपरगाव या पिण्याच्या पाणी योजनेस मंजुरी देऊन आर्थिक तरतूद केली असून ती नवनिर्वाचित अध्यक्षांनी पूर्ण करावी. विवेक कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरासिटामॉल औषधी प्रकल्प उभारणी सुरू करून दर्जेदार रासायनिक उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन आगामी सात वर्षात राज्यातील पहिल्या दहा सहकारी साखर कारखान्यात संजीवनी कोल्हे कारखान्याचे नाव अग्रभागी राहण्यासाठी त्यांच्यासह संचालक सभासद, शेतकरी प्रयत्न करत आहे. चालू गळीत हंगामात संजीवनीने सव्वा आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून दोन कोटी युनिट सहवीज निर्मितीवर भर देणार आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढावे यासाठी ८६०३२, एम एस १०००१, कोसी ६७१ या नवीन संशोधित वाणाच्या लागवडीस प्राधान्य देत आहे त्यास सभासद शेतकऱ्यांनी साथ द्यावी. कारखाना अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करावी, असे ते म्हणाले. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या