Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक-पुणे रेल्वेला केंद्राकडून लवकरच मंजुरी

नाशिक-पुणे रेल्वेला केंद्राकडून लवकरच मंजुरी

सिन्नर । प्रतिनिधी

ठाकरे सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाची घाईगडबडीने घोषणा केली होती. मात्र, नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला अद्यापही केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही. लवकरच केंद्र सरकार यात लक्ष घालणार असून प्रकल्पास मंजुरी मिळणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

- Advertisement -

भाजपाच्या जनसंपर्क अभियानातंर्गत येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष केदा आहेर, दिनकर पाटील, आमदार देवयानी फरांदे, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे उपस्थित होते. केंद्र सरकारने देशातील करोडो जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. 80 कोटी लोकांना आजही मोफत धान्य दिलें जाते. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घरोघरी शौचालये निर्माण करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण जनतेसाठी आवास योजनेअंतर्गत अनेक कोटी घरे निर्माण करण्यात आली.

मोदी सरकार हे गोरगरीब, शेतकरी आणि दिन दलितांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ना. दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना व महिलांना त्यांच्या समस्या विचारल्या. तसेच शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. रमेश दराडे यांनी सिन्नर तालुक्यातील चार कार्यकर्त्यांवर गोमांंस वाहतूक रोखल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल झाला असल्याबद्दल दानवे यांना माहिती दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी कार्यकर्त्यांनी दानवे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यात इंडिया बुल्स प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा, शेतीमालाला भरघोस भाव मिळावा, पोलीस पाटलांच्या मानधनांमध्ये वाढ करावी या मागण्यांचा समावेश होता. बाळासाहेब हांडे यांनी सूत्रसंचालन केले. शहरातल्या कार्यक्रमानंतर दानवे यांनी मुसळगाव येथे विकास तीर्थ यात्रेचा नारळ वाढवून शुभारंभ केला. त्याचबरोबर उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर भोजनाचा आनंद घेतला.

यावेळी ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, विष्णु सानप, किशोर देशमुख, भाऊसाहेब आव्हाड, राजेंद्र घुगे, सुदर्शन सांगळे, समाधान गायकवाड, सविता कोठुरकर, योगिता खताळे, सुमन जोशी, मंगला झगडे, रुपाली काळे, समाधान केकाण, विशाल क्षत्रिय, सजन सांगळे, किरण सांगळे, रामदास भोर, यज्ञेश काळे, पंडित कांबळे, रामनाथ डावरे, प्रियंका द्विवेदी, मीरा सानप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभेची जागा भाजपनेच लढवावी: आव्हाड

जयंत आव्हाड़ यांनी नाशिक-पुणे रेल्वेच्या विषयाला हात घालत हा प्रकल्प रखडला असल्याचे दानवे यांच्या लक्षात आणून दिले. शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत. मात्र, शासन जमीन घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमालाला आणि कांद्याला समाधानकारक भाव मिळाला पाहिजे याविषयी त्यांनी भूमिका मांडली. नाशिक लोकसभेची जागा भाजपानेच लढवली पाहिजे असा आग्रह आव्हाड यांनी ना. दानवे यांच्याकडे धरला.

- Advertisment -

ताज्या बातम्या