लोकसहभागातून साकारतोय सिमेंट बंधारा

jalgaon-digital
1 Min Read

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

सुरगाणा तालुक्यातील Surgana Taluka ठाणगाव Thangaon गावाशेजारी ईराचाखडक Irachakhadak येथे लोकसहभागातून साकारतोय सिमेंट बंधारा याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

या कामासाठी जलपरिषद मित्र शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक संस्था, वैद्यकीय,सामाजिक कार्येकर्ते, पत्रकार, समाजसेवक, सर्व शासकीय, निम शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, रेशन दुकानदार, शिक्षक मित्र ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, मित्र मंडळ ठाणगाव यांच्या सरळ हाताने दिलेल्या देणगीतून साकारतोय भव्यदिव्य सिमेंट केटीवेअर बंधारा बांधला आहे.

‘चला जलमित्र बनू या.. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हेच जीवन’ या विचाराच्या प्रेरणेतून ठाणगाव येथील जलपरिषद मित्र नामदेव पाडवी, दिलीप महाले, जयप्रकाश महाले, योगेश महाले यांच्या संकल्पनेतून व ठाणगाव गावातील सर्व तरुण युवकांच्या सहकार्याने ठाणगाव येथे इराचा खडक (दशक्रिया विधीची जागा) येथे लोकसहभागातून सिमेंट केटीवेअर बंधारा बांधण्यात येत आहे.

या सिमेंट केटीवेअर बंधार्‍याचा उपयोग दशक्रिया विधीकरीता पाणी, जंगली पशु, पक्षी, प्राणी, पाळीव जनावरे यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. कपडे धुणे व इतर कारणांसाठी पाणी पुरवठा होणार आहे.

या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वनराई बंधारा बांधण्यात येत होता.परंतु आता लोकसहभागातून साकारणारा सिमेंट केटीवेअर बंधार्‍याला प्रत्येकाने सरळ हाताने मदत करून दशक्रिया विधीची जी कायमची अडचण होती ती सर्वांच्या मदतीने दूर केली.

दिलीप महाले, जलपरिषद मित्र

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *