Friday, April 26, 2024
Homeनाशिकबिटको हॉस्पिटलमध्ये दिव्यांग कक्ष

बिटको हॉस्पिटलमध्ये दिव्यांग कक्ष

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये दिव्यांगांसाठी नवीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दिव्यांगांना अनफिट प्रमाणपत्र बरोबरच इतर प्रमाणपत्र नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल येथे वैद्यकीय पाहणीनंतर मिळणार असल्याने नासिकरोडच्या आसपास असणार्‍या पंचक्रोशीतील दिव्यांगांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत येथील कक्ष प्रमुख डॉ शिल्पा काळे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

दिव्यांगांसाठी नाशिकरोड बिटको हॉस्पिटलमध्ये नवीन कक्षाची सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी दिव्यांग यांना प्रमाणपत्र देण्यासाठी वैद्यकीय मोजमाप होणार आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघाताने बोट किंवा हात गेलेला असला अथवा इतर शारीरिक अवयव कमी झालेला असला तर त्याची वैद्यकीय तज्ज्ञांकडून मोजमाप करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही सेवा झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे कार्यरत होणार होती, मात्र तेथे कोविड सेंटर असून नाशिक रोडला बिटको हॉस्पिटल येथे ही सुविधा नव्याने करण्यात आली आहे.

करोनामुळे या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून प्रत्यक्ष कामाला औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली. यावेळी समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष तनुजा बबनराव घोलप, तालुकाप्रमुख सोनाली सोनवणे, गायत्री पगार शहराध्यक्ष, जयश्री गोडसे उपशहराध्यक्ष शोभा पाटील, सचिव सुवर्णा काळुंगे यांनी या कक्षाच्या नासिकरोड विभाग प्रमुख डॉ शिल्पा काळे यांच्याकडून माहिती मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या