Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने होळी सण साजरा

जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने होळी सण साजरा

नाशिक । प्रतिनिधी

देशभरात थैमान घातलेल्या करोना संसर्गाचा नायनाट होऊ दे अशी प्रार्थना करुन गल्ली बोळात, अंगणात होळी पेटवण्यात आली. पारंपरिक पध्दतीने होळीची पूजा करुन नाशिककरांनी मोठ्या उत्साहात सण साजरा केला.

- Advertisement -

दरवर्षी मोठया प्रमाणात साजर‍ केला जाणारा सार्वजनिक होळीच्या सणावर यंदा करोना संकटामुळे मर्यादा होत्या. करोनाचे संकट दूर कर, अशी होळीला प्रार्थना करत पुढच्या वर्षी नक्कीच मोठ्या आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करु असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला.

यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आहेत. शासनदेखील , मोठ्या आणि परिसर होळी उभारणार्‍या तरुणाईने व्यक्त केला. यंदाच्या होळीत करोनाचे दहन केले, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात आणि सर्वांच्या उपस्थितीत साजरा होणारा होळीसारखा महत्वाचा सणदेखील यंदा घरासमोरील अंगणातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीतीच प्रातिनिधीक स्वरुपात पार पाडावा लागला. शनिवार, रविवार कडक निर्बंधांची सक्ती असल्याने बाजारात ग्राहक वर्गाची कमी जाणवली. होळीसाठी लागणारे गोवर्‍या, कापुर, पूजा साहित्य खरेदीसाठी फारसा ग्राहक वर्ग मिळाला नाही. यामुळे होळीला कोरोनाच्या नावानेच बोंब मारण्याची वेळ आली.

मार्चच्या प्रारंभापासून कोरोना रुग्णसंख्तेत प्रचंड वाढ झाल्याने सर्व बालगोपाल, तरुणाईच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी फेरले गेले. नाशकात सर्वात मोठी होळी यशवंत महाराज पटांगणावर तसेच सरदार चौकात, शनी मंदिर चौक, नेहरू चौक, रविवार कारंजा, घनकर गल्ली आणि पंचवटीतील नागचौकात होळी उत्सव साजरा केला जातो. त्याशिवाय जुने नाशिक आणि पंचवटीतील गल्ल्यांमध्ये पारंपरीक पद्धतीने होळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी हाेते.

होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे, गोवर्‍या, वाळलेले गवतदेखील होळीत टाकून नारळदेखील अर्पण करण्याची परंपरा आहे. यावर्षी करोना वाढत असल्याने शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या होळ्या पेटल्याच नाही. मोठ्या मोठ्या चौकात पेटणार्‍या महाकाय होळ्या सुरु असलेले निर्बंध आणि रात्री पोलीसांची पेट्रलिंग यामुळे सोसायटी, गल्ली, घरासमोरील जागेत प्रातिनिधीक स्वरुपात ५, १० गोवर्‍या रचून साजरी करण्यात आली.

पुढच्या वर्षी आनंदोत्सव

आपली प्राथमिकता नियम पाळण्यासाठी असावी. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, वा गर्दीत सामिल होऊ नये. पुढच्या वर्षी नक्कीच कोरोनाचा नायनाट होईल आणि होलिकोत्सव आणि रंगोत्सव आनंदाने साजरा करता येईल.

-किरण नाईक, तरुण, जुने नाशिक.

नियम पाळतोच

आपण गर्दी जमविली किंवा त्यात सामिल झालो तर अनेक पटीने कोरोना वाढण्यास मदत होईल. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नियम पाळावेत, ते स्वत:सह आपल्या कुटुंबासाठी फायद्याचे ठरेल. मी स्वत: मास्क, सॅनेटायझर नियमित वापरतो.

पवन परदेशी, तरुण, पंचवटी.

संकट थोपवणे आपल्या हातात

आलेले संकट थोपवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामुळे आम्ही निर्देशानुसार प्रातिनिधीक स्वरुपात होळी केली. पुढच्या वर्षी नक्कीच मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करु. कोरोनाला संपविण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे.

प्रियदर्शन शार्दुल, तरुण.

- Advertisment -

ताज्या बातम्या