Thursday, April 25, 2024
Homeनगरसिनेअभिनेतेच्या उपस्थितीत झाडाचा वाढदिवस साजरा

सिनेअभिनेतेच्या उपस्थितीत झाडाचा वाढदिवस साजरा

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

तालुक्यातील मोऱयाचिंचोरे हे गाव यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत गडाख यांनी दत्तक घेतलेले आहे. या गावात प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपन चळवळ, यशवंत वाचनालय, रुग्णालय, गाव अंतर्गत सुशोभीकरण, तंटामुक्त गाव आदी संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

गावात हजारो देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले आहे या गावाचा परिसर संपुर्णपणे हिरवाईने नटला आहे.गेल्यावर्षी सिनेअभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांचे हस्ते 5 हजार झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे यांनी ग्रामस्थांना शब्द दिला होता तुम्ही या झाडांचे जतन संगोपन केले की ही झाडे पाहण्यासाठी व गावाला भेट देण्यासाठी परत नक्की येईल हा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्याप्रमाणे शुक्र दि 21 ऑगस्ट 2020 रोजी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी मोरयाचिंचोरे या गावाला भेट दिली. स्वतःच्या हस्ते लावलेल्या झाडाचा पुंडलिका वरदे हरी विठ्ठलच्या गजरात वाढदिवस साजरा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या