Friday, April 26, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरमध्ये एटीएम फोडल्याचा फोन आला हैद्राबादहून; सीसीटिव्हीत घटना कैद

त्र्यंबकेश्वरमध्ये एटीएम फोडल्याचा फोन आला हैद्राबादहून; सीसीटिव्हीत घटना कैद

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

शहरात बँकेचे एटीएम (ATM Robbery) फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील पाटील गल्ली (Patil lane) येथील सेंट्रल बँकेचे (Central Bank of india) एटीएम अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना घडली….

- Advertisement -

एटीएम फोडून रक्कम नेण्यात चोरटे अयशस्वी ठरले असले तरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठिकाणी हा प्रयत्न झाल्यामुळे नागरिकत दहशतीखाली आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न झाला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. एटीएम फोडतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (CCTV footage of robbers)

सेंट्रल बँकेच्या हैदराबाद शाखेने त्र्यंबकेश्वर पोलिसांना फोन द्वारे ही माहिती कळवली. त्र्यंबक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सी.सी.टी. व्ही चेक करण्यात आले. एटीएम मधून सायरन न वाजल्याने सिक्युरिटी गार्ड नसल्याचे समोर आले आहे. पोलीस कर्मचारी श्रावण साळवे, समाधान केदारे यांनी अधिक तपास सुरू ठेवला आहे. पोलीस एटीएममध्ये दाखल होण्यापूर्वीच चोरटा पसार झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या