Saturday, April 27, 2024
Homeजळगावसावधान... कॅरिबॅगचा वापर केल्यास विक्रेत्यांसह नागरिकांवरही कारवाई!

सावधान… कॅरिबॅगचा वापर केल्यास विक्रेत्यांसह नागरिकांवरही कारवाई!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यात प्लास्टीक वापरास (Use plastic) बंदी असतांनाही जळगाव शहरात प्लास्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे जळगाव शहर प्लास्टीकमुक्त (Jalgaon city is plastic free) करण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) ह्या अ‍ॅक्शन मोडवर आल्या आहेत. दरम्यान, प्लास्टीकचा वापर केल्यास केवळ उत्पादकच नाहीतर, विक्रेत्यांसह नागरिकांवरही दंडात्मक कारवाई (Punitive action against citizens) करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त. डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisement -

जळगाव शहर प्लास्टीकमुक्त (Jalgaon city is plastic free) करण्याच्या उद्देशाने शहरातील व्यावसायिक, विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांची मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात बैठक (Meeting) घेतली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त तथा आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी उपस्थित विक्रेत्यांना कॅरिबॅगचा (carrybags) वापर करु नये अशा सूचना दिल्या. तसेच विक्रेत्यांच्या भावनादेखील त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

कारवाईसाठी आरोग्य विभागाचे पथक

कॅरिबॅग मुक्त शहर करण्यासाठी तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होवू नये यासाठी दि. 25 मे पासून मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागामार्फत (Department of Health) कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. मनपाच्या चारही प्रभाग समिती कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांसह एमआयडीसीसाठी अतिक्रमण विभागाचे पथक नेमण्यात आले असून, कारवाई (Action) तीव्र केली जाणार आहे. प्लास्टीकची कॅरिबॅग आढळून आल्यास विक्रेत्यांसह वापरकर्त्या नागरिकांवरदेखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे.

कॅरिबॅगचा वापर टाळा कॅरिबॅगमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे कॅरिबॅगचा वापर टाळावा. तसेच बाजारात येतांना कापडी पिशवीचा वापर करावा. असे आवाहन देखील आयुक्त गायकवाड यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या