Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : रेशनिंगचा गहू घेऊन जाणारा ट्रक पकडला

इगतपुरी : रेशनिंगचा गहू घेऊन जाणारा ट्रक पकडला

घोटी | Ghoti

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील रेशन दुकानातून २० कट्टे रेशनिंगचा गहू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनासह संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले.

- Advertisement -

याबाबत पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात गहू कट्टे, वाहन जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून खुल्या बाजारात रेशनचे धान्य विकणा-यांचे धाबे दणाणले आहे.

श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, सरपंच बाबुराव बांगारे, तालुकाध्यक्ष भगवान डोखे आदींनी पाळत ठेऊन गावाबाहेत पकडला. त्यांनी तात्काळ त्र्यंबकेश्वर तहसील व घोटी पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती दिल्याने यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन मुद्देमाल व संशयितांना ताब्यात घेतले.

त्र्यंबकेश्वर पुरवठा निरीक्षक रमजान तडवी यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या