या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य

नंदुरबार ।nanadurbar प्रतिनिधी

आतापर्यंत फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational Courses) प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होते, येणार्‍या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम (Non-Professional Courses) प्रवेशासाठीही (admission) जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Certificate Verification) अनिवार्य (Mandatory) करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री (Tribal Development Minister) डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. किरण लहामटे, नाना पटोले, संजय सावकारे, धर्मराव बाबा आत्राम यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासी उमेदवार यांनी जागा बळकावणे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, जात प्रमाणपत्र निर्गमित करणे आणि त्याची पडताळणी करणे याबाबतची काही नियमावली आहे. त्यानुसारच राज्यातील मागास प्रवर्गातील जाती आणि जमातींना प्रमाणपत्र देण्यात येते तसेच या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येते. सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत होणार्‍या प्रवेशांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. येणार्‍या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये जात वैधता समित्यांची संख्या सातने वाढविण्यात आली असून आता राज्यात 15 जात वैधता समित्या आहेत. येणार्‍या काळात जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्रासंदर्भातील कार्यवाही सुटसुटीत होण्यासाठी नवीन प्रणाली आणण्याचा अभ्यास करण्यात येईल.

जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार

शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागणार्‍यांना संबंधित उमेदवारांना जातीचे दाखले आवश्यक असतात. हे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम, डॉ. किरण लहामटे, अशोक पवार, नाना पटोले, सुनील भुसारा, डॉ. देवराव होळी यांनी आदिम जनजाती समाज शासनाच्या सेवांपासून वंचित राहण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.मंत्री डॉ. गावीत म्हणाले की, राज्यातील तीन आदिम जमातींसाठी मुंबई विद्यापीठाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. गावांगावांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्रामसखीची नियुक्ती करण्यात आली आहे


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *