Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारजिल्हयातील तिघांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

जिल्हयातील तिघांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी(Police personnel) कमलसिंग जाधव, दरा येथील माध्यमिक शिक्षक (Secondary teacher) बखतसिंग जाधव व चुनिलाल जाधव यांची जात वैधता प्रमाणपत्रे (Caste validity certificates) रद्द (canceled) करुन त्यांच्यावर कलम १० व ११ अन्वये कारवाईचे आदेश नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने (Scheduled Tribes Certificate Committee) दिले आहेत.

- Advertisement -

वाघर्डे ता.शहादा येथील सखाराम जहांग्या मोते व अखिल भारतीय अदिवासी बारेला समाज (All India Adivasi Barela Samaj) यांच्यावतीने पोलीस मुख्यालयातील कर्मचारी कमलसिंग सत्तरसिंग जाधव, दरा येथील माध्यमिक शिक्षक बखतसिंग सत्तरसिंग जाधव व त्यांचे भाऊ चुनिलाल दगा जाधव यांच्याविरोधात त्यांनी प्राप्त केलेल्या बोगस जात वैधता प्रमाणपत्र (Certificate of validity) व त्याआधारित सरकारी नोकरी प्राप्त करून घेवून आदिवासी समाजाचे नुकसान केल्याप्रकरणी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे ऍड. जगदिश कुवर यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवर सुनावणी होवून वरील तिन्ही लोकांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द(canceled) करून समितीने कलम १० व ११ अन्वये कारवाईचे आदेश दिले आहेत. ऍड. भगतसिंग पाडवी यांनी याप्रकरणी सहकार्य केले.

बखतसिंग सत्तरसिंग जाधव, कमलसिंग सत्तरसिंग जाधव व चुनिलाल दगा जाधव यांनी त्यांचे वाडवडीलांचे रक्तनातेवाईकांच्या हिंदू पाटील असलेल्या जातीचे पुरावे तत्कालीन नाशिक/ नंदुरबार समितीपासून लपवून वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत.

बखतसिंग सत्तरसिंग जाधव, कमलसिंग सत्तरसिंग जाधव व चुनिलाल दगा जाधव यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर सेवा मिळविली, निवडणूक लढविली असल्यास त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० च्या कलम १० व ११ अन्वये कारवाई (Action) करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या