Saturday, April 27, 2024
Homeनगर50 हजार घेऊन कोल्ड्रिंक्स गाडीचा चालक पसार

50 हजार घेऊन कोल्ड्रिंक्स गाडीचा चालक पसार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथे कोल्ड्रिंक्सच्या गाडीवर चालक म्हणून काम करत असलेल्या राहुरी खुर्द येथील तरुणाने कोल्ड्रिंक्सचा माल पोहोच करून

- Advertisement -

परस्पर 50 हजार रुपये घेऊन पसार झाल्याची घटना दि.22 व 25 जानेवारी रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी फिरोज इक्बाल शेख (वय 38 वर्षे, रा. राहुरी) यांचा राहुरी शहरहद्दीत कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय आहे. आरोपी समिर जाफर शेख ऊर्फ हितेश प्रदीप बनकर रा. राहुरी खुर्द, हा फिरोज शेख यांच्या पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करत होता. दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान व 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान आरोपी हा पिकअप गाडीमध्ये कोल्ड्रिंक्सचा माल घेऊन कुकाणा येथे पोहोच करण्यासाठी गेला होता.

माल पोहोच करून त्याने परस्पर मालाचे 50 हजार रुपये घेतले आणि पसार झाला. 50 हजार रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिरोज शेख यांनी राहुरी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून समिर जाफर शेख ऊर्फ हितेश प्रदीप बनकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या