Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिंडोरीत युवकावर गुन्हा दखल

दिंडोरीत युवकावर गुन्हा दखल

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar )यांच्यावर सोशल मीडीयावर टिका करणार्‍या युवकावर दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरून सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट अकाउंट खोलून टीका करणार्‍या युवकाची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी जिल्हाभरातल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निखिल भामरे (ता. बागलाण, जि. नाशिक) या युवकाचा शोध घेण्यास सांगितले.

रात्री उशिरा युवकाचा शोध दिंडोरी तालुक्यात लागला असता, राष्ट्रवादीयुवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामराव हिरे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार यांनी त्यास पकडून दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये हजर करण्यास सांगितले.निखिल भामरे यास त्याच्या पालकांसमोर समज देण्यात आली.

दिंडोरी पोलीस ठाणेमध्ये निखिल भामरे या युवकावर 165/2022 आयपीसी 294,153 (अ), 500, 501,504,506,नुसार काल गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार निखिल भामरे यास नाशिक पोलीस ठाणे, कळवा पोलीस ठाणे, बारामती पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी न्यायालयाच्या माध्यमातून नेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या