Friday, April 26, 2024
Homeनाशिकगोदावरी नदी शुद्धिकरण मोहीम राबवा : महामंडलेश्वर सोमेश्वरानंद

गोदावरी नदी शुद्धिकरण मोहीम राबवा : महामंडलेश्वर सोमेश्वरानंद

त्र्यंबकेश्वर । Trambakeshwar

गंगा गोदावरी गटारमुक्त करावी, गोदावरी शुद्धिकरण मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी श्रीराम शक्ती पिठाचे पीठाधिश्वर महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नाशिकमध्ये केली.

- Advertisement -

सोमेश्वरानंद महाराज हे श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे असून बेझे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे वास्तव्यास असतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष गटारमुक्त गोदावरीसाठी हे महंत वेधणार आहेत. गीता जयंतीनिमित्त स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नाशिक येथे नवश्या गणपती व रामकुंड गोदावरीची पाहणी कली. रामकुंडावर गंगा गोदावरी पूजन केले, यावेळी ते बोलत होते.

यात्रेकरूंची होणारी गर्दी, नदीवर असलेली श्रद्धा, दर बारा वर्षांनी या ठिकाणी होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन नाशिककडे भाविक येतात. याचा विसर पडू देऊ नका, असे महामंडलेश्वर म्हणाले.

यावेळी श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, शिवसेना उपमहानगरप्रमुख दिगंबर मोगरे, नितीन थेटे, अजय जगताप उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या