Thursday, April 25, 2024
Homeजळगाववेदांत प्रकल्प गेल्यानंतर दुसऱ्या प्रकल्पाचे गाजर-अजित पवार

वेदांत प्रकल्प गेल्यानंतर दुसऱ्या प्रकल्पाचे गाजर-अजित पवार

चाळीसगाव | प्रतिनिधी chalisgaon

देशात व महाराष्ट्रात (maharastra) बेरोजगारीचा प्रश्न जटिल झाला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात जवळपास दिड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांत प्रकल्प (Vedanta Project) उभारणीसाठी निश्चित झाले असताना हा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर म्हणजेच गुजरात (gujrat) राज्यात जाणे हे योग्य नाही. आता सत्ताधार्‍यांकडून वेदांत गेल्यानतंर दुसरा प्रकल्प महाराष्ट्रात आनण्याचे गाजर दाखवणू पळवाट काढली जात असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

- Advertisement -

अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज…!

औरंगाबाद-चाळीसगाव मार्गे पाचोरा जळगाव येथे जाण्यापूर्वी चाळीसगाव येथे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते.चाळीसगाव भेटी दरम्यान वेदांत प्रकल्पवरुन राज्यातील नेत्यांनी आपल्या राज्याच्या हिताचा विचार करीत राज्याचा विकास साधण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रात उभारला जाण्याची निश्चित झाले असताना राज्यातील सरकार बदलले आणि सत्ता बदलाबरोबरच वेदांत सारख्या जवळपास दीड लाख बेरोजगारांना रोजगार देणारा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर नेला जात आहे. वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी आता गुजरातकडे गेला जात आहे. याबाबत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात व्हावे. यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करावी. या संदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, रोहीत पवार, सुभाष तोटे यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा. यासाठी मुख्यंत्र्यांनी प्रयत्न करावेत.

अजित पवार पुढे म्हणाले की, मविआचे सरकार असतांना वेदांत प्रकल्प राज्यात व्हावा. यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. सवलतींही दिल्या होत्या. तळेगाव येथे एक हजार जागा देखील निश्चित झाली होती. मात्र हा प्रकल्प इतर राज्यात गेला आहे. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांचे केंद्रात चांगले संबंध आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा. दूसरा प्रकल्प येईल. अशा पळवाटा दाखवण्यासह गाजरही दाखवू नये. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेंचे संचालक प्रदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील आदि उपस्थित होते. बाजार समितीला भेट देतांना अजित पवार यांनी अशासकीय प्रशासक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले.

अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज…!

- Advertisment -

ताज्या बातम्या