Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआजची गुंतवणूक उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी; विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्यात मार्गदर्शन

आजची गुंतवणूक उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी; विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्यात मार्गदर्शन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (MVP) नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये (Maratha Highschool) ‘करिअर कट्टा’ (Career Katta) या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले…

- Advertisement -

अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक संजय डेर्ले, पर्यवेक्षक शरद शेजवळ, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे तसेच प्रमुख व्याख्यात्या म्हणून डॉ. दिपाली चांडक तसेच प्रमुख अतिथी म्हणून के टी एच एम कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ. संदीप टिळे उपस्थित होते.

प्रास्ताविक के टी एच एम कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व करिअर कट्टा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.संदीप टिळे यांनी तर प्रमुख व्याख्याता परिचय विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद शेजवळ यांनी करून दिला.

याप्रसंगी आयोजित ‘भारतीय बाजारपेठेतील सुरक्षित गुंतवणूक’ या विषयावर आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. भारतीय निवेश आणि गुंतवणूक विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलताना डॉ. दिपाली चांडक म्हणाल्या की ‘आज केलेली छोटी गुंतवणूक ही उद्याच्या उज्वल भविष्याची नांदी ठरू शकते यासाठी फक्त नागरिकांनी सुरक्षित पर्यायांचा उपयोग करून नोंदणीकृत संस्था व्यक्ती यांच्याकडेच गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून त्याद्वारे आपल्याला कमी जोखीम आणि जास्त परतावा मिळू शकेल यासाठी सेबीच्या वतीने विविध सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आज उपलब्ध असून त्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला आनंदी आणि सुखी जीवनासाठी उपयोगी ठरू शकते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे म्हणाल्या की, आर्थिक साक्षरता सर्वांसाठी गरजेची असून सुरक्षित गुंतवणुकीतून जागरूकता निर्माण होईल आणि ऑनलाइन माध्यमातून होणारी फसवणूक टाळता येईल यासाठी भारतीय निवेश आणि गुंतवणूक विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

सूत्रसंचालन चैताली गिते यांनी तर आभार करियर कट्टा विभाग समन्वयक किरण शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या