Saturday, April 27, 2024
Homeनगरकार चोरून विकणार्‍या चार जणांना नेवासा पोलिसांनी केले जेरबंद

कार चोरून विकणार्‍या चार जणांना नेवासा पोलिसांनी केले जेरबंद

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

भाड्याने केलेली गाड़ी चोरून विक्री करणार्‍या चार आरोपींना नेवासा पोलिसांनी पाटोदा पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

- Advertisement -

दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी फिर्यादी दीपककुमार हरिश्चंद्र गुप्ता (वय 30 वर्षे) धंदा ड्रायव्हर, रा. सांताक्रूझ मुंबई हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्टकार क्रमांक एमएच 02 सीआर 7642 ही घेऊन मुंबई येथे असताना त्यांना जस्टडायलवरून मुंबई ते औरंगाबाद भाडे आल्याने त्यांनी आरोपींच्या मोबाईलवर फोन भाडे स्विकारले. सायंकाळी 7 वा. सुमारास तीन इसमांना गाडीमध्ये बसवून बांद्रा येथून औरंगाबाद ठरवून येथे दि.20 रोजी जात असताना गाडी अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत हांडीनिमगाव शिवारात 5 वा. सुमारास फिर्यादीस लघवी आल्याने गाडीला चावी ठेवून लघुशंका करण्यासाठी खाली उतरला. त्याचवेळी आरोपींनी गाडी चालू करून चोरून नेली. अशा फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन गुरनं. 888/2021 भादंवि. 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचेकडील मोबाईल सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत असताना आरोपी पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत चोरलेली स्विप्ट कार फिरत असल्याबाबत समजल्याने त्याठिकाणी सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोना. अशोक कुदळे, पोकॉ. अंबादास गिते, केवल रजपूत, संजय माने यांनी पाटोदा पोलीस स्टेशन अतंर्गत रायमोह पोलीस दूरक्षेत्र येथून पाटोदा पोलीस स्टेशन फडोल पोना. एन.ए. माने तसेच पोकॉ जी. व्ही. सानप यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत असताना ते गुन्ह्यात चोरलेल्या स्विप्टकारसह रिजवान मोहम्मद पठाण (वय 30 वर्षे) रा. निरगुडी ता. पाटोदा जि.बीड, महेश रामकृष्ण आघाव (वय 35 वर्षे) रा खांकरमोह ता. शिरूर कासार जि.बीड, बागवान अफताव बागवान रहीमुद्दीन (वय 23 वर्षे) रा. प्रकाश आंबेडकर नगर वॉर्ड क्र. 25 बीड व जुबेर मुसा बागवान (वय 21 वर्षे) रा. टाफरवन ता. माजलगाव जि. बीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींंनी त्याच्या इतर एका साथीदारासह गाडी चोरून ती विक्री करत असताना पकडले आहे.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपींकडून अशाच प्रकारे इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, सपोनि माणिक चौधरी, पोसई नितीन पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोना अशोक कुदळे, बबन तमनर, बाळासाहेब कोळपे, पोकॉ. अंबादास गिते, केवल रजपूत, संजय माने, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर सायबर सेल यांचेकडील पोना. फुरकान शेख तसेच पाटोदा पोलीस स्टेशन कडील पोना. एन. माने व पोका. जी सानप यांनी केली.पुढील तपास पोना. अशोक कुदळे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या