Friday, April 26, 2024
Homeनाशिक५० फुट खोल विहिरीत आढळली कार; सांगाडयाचे रहस्य काय?

५० फुट खोल विहिरीत आढळली कार; सांगाडयाचे रहस्य काय?

पंचाळे | वार्ताहर

पंचाळे-पांगरी रस्त्यालगत बेदरकर यांच्या 50 फूट विहिरीत कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

आज (दि 30) रोजी लासलगाव -संगमनेर मार्ग असलेल्या पंचाळे गावापासून दक्षिण बाजूस पांगरी गावाकडे जाताना एक किलोमीटर अंतरावर सुधाकर मधुकर बेदरकर यांच्या मालकीची 50 फूट विहीर आहे.

या विहिरीत वीस ते पंचवीस फूट पाणी होते. सध्या विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू असल्याने विहिरीमध्ये सात ते आठ फूट पाणी शिल्लक असल्याने सकाळी आठच्या सुमारास विहिरीतील पाणी बघत असताना ही घटना उघडकीस आली.

बेदरकर यांचा मुलगा केतन मक्‍याला पाणी देण्याचे काम करत असताना त्याला हे वाहन विहिरीत पडलेले दिसून आले.

याबाबत ग्रामस्थांना कल्पना माहिती मिळताच ग्रामस्थांनी गाडी बघण्यासाठी विहिरीवर गर्दी केली.

या घटनेत विहिरीत पडलेली गाडी बाहेर काढल्यानंतर गाडीचा क्रमांक एमपी झिरो नऊ झिरो नऊ सीआर 62 94 असा दिसून आला आहे.

त्यामध्ये एका व्यक्तीचा सांगाडा सापडला आहे. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज बांधला जात आहे. गाडीचे डाव्या बाजूचे टायर फुटलेले दिसून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या