Thursday, April 25, 2024
Homeनगरवाहनावरील ताबा सुटून गाडी दरीत कोसळली

वाहनावरील ताबा सुटून गाडी दरीत कोसळली

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील चिचखांड या घाटात काल सकाळी सात ते आठच्या दरम्यान डॉ. प्रवीण गंगाराम कवडे (वय 40) हे अकोल्याहून कोतुळकडे जात असताना चिचखांड घाटामध्ये त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली. सुर्दैवाने डॉ. कवडे हे बालंबाल बचावले.

- Advertisement -

ही घटना सकाळच्या वेळी झाल्याने येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. रात्रीच्या वेळी हा अपघात घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या रस्त्याच्या साईट पट्ट्या व घाटलगत रस्ता असल्याने साईट बांधकाम नाही व दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे अनेक वाहनांची या अगोदर देखील अपघात झालेले आहेत.

प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्ता गेल्या दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेतून पूर्ण करण्यात आला असला तरी या रस्त्याने अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ऊसाची वाहतूक केली जाते. मात्र उसाची वाहतूक करत असताना अनेक वाहनांना मोठा उतार असल्याने ब्रेक लागणे अवघड आहे.

अनेक वाहनांचे असे प्रकार अपघाताची घडले असून याकडे मात्र कोणाची लक्ष जात नाही. तरी प्रशासनाचे याकडे लक्ष जाईल का? असा देखील प्रश्न या भागातील शेतकरी व नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

अकोले कोतूळ हा रस्ता गेल्या चार ते पाच वर्षांपासून पिंपळगाव खांड धरणाचे पाणी अडवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद झाली. आणि पर्यायी मार्ग म्हणून धामणगाव पाट-कोतूळ -अकोले असा मार्ग सुरू झाला. मात्र या मार्गाने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या