Friday, April 26, 2024
Homeनगरगांजाची शेती करणार्‍याला पकडले

गांजाची शेती करणार्‍याला पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यातील रांधे येथील सज्जन वस्ती येथे गांजाची शेती करणार्‍यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. गांजाची शेती करणार्‍या काशिनाथ दत्तात्रय आवारी (वय 32, सज्जनवस्ती, रांधे, ता. पारनेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली.

- Advertisement -

याप्रकरणी राहुल भाऊसाहेब सोळंके यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात आवारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत तीन लाख 65 हजारांची गांजाची 95 झाडे जप्त केली. रांधे येथे आवारी याने गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना ही माहिती कळविण्यात आली. पोलीस अधीक्षक पाटील यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार विष्णू घोडेचोर, भाऊसाहेब कुरूंद, विजय वेठेकर, संदीप पवार, देवेंद्र शेलार, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, शंकर चौधरी, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, रोहित मिसाळ, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या