Friday, April 26, 2024
Homeधुळेकपाशीच्या पिकात गांजाची लागवड

कपाशीच्या पिकात गांजाची लागवड

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील उर्मदा शिवारात कपाशी पिकात करण्यात आलेली गांज्याची शेती शिरपूर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केली.

- Advertisement -

या ठिकाणाहून 704 किलो वजनाचा गांजा सदृष्य अंमली पदार्थ सुमारे 14 लाख आठ हजार रुपये किंमतीचे जप्त करण्यात आले. या प्रकरणी शेत मालकासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

उर्मदा ता. शिरपूर गावाच्या शिवारात एका शेतात अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थाच्या वनस्पतींची लागवड केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि.18 नोव्हेंबर रोजी पथकाने उर्मदा शिवारात असलेल्या शेतावर छापा टाकला. त्यावेळी कपाशी पिकात गांज्याची लागवड केल्याचे निदर्शनास आले.

या ठिकाणाहून 704 किलो वजनाचा गांजा सदृष्य अंमलीपदार्थाचे वनस्पतीचे हिरवे ओले ताजे झाड, पाने व फांद्या असलेले मुळासह, मुळापासून ते शेंड्यापर्यंत उंची असलेले 4 ते 6 फूट झाडे जप्त करण्यात आली. सदर शेताचे मालक अपसिंग दित्या गुलवणे हा आहे.

या प्रकरणी पोहेकॉ लक्ष्मण उखा गवळी यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन एनडीपीएस कायद्यांन्वये तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई नरेंद्र खैरनार हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, पोसई नरेंद्र खैरनार, दीपक वारे, पोहेकॉ लक्ष्मण गवळी, हेमंत फुलपगारे, शामसिंग वळवी, पोना अनारसिंग पवार, प्रवीण धनगर, अनंत पवार, पोकॉ गोविंद कोळी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, शामसिंग पावरा, महिला पोकॉ आश्विनी चौधरी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या