Thursday, April 25, 2024
Homeनगरअखेर गांजा प्रकरणातील पसार आरोपीला आश्वी पोलिसांकडून अटक

अखेर गांजा प्रकरणातील पसार आरोपीला आश्वी पोलिसांकडून अटक

आश्वी |वार्ताहर| Ashwi

सुमारे दोन वर्षापूर्वी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी मार्गे येत असलेल्या एका चारचाकी वाहनात संशयास्पद हालचाली दिसल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या

- Advertisement -

तरुणानी आश्वी पोलिसाना माहिती दिल्यानतंर पोलिसांनी आश्वी ते झरेकाठी या रस्त्यावर गुन्हेगाराचा थरारक पाठलाग करुन एका गुन्हेगाराला पकडले होते. या हुदाई कंपनीच्या क्रियटा गाडीत सुमारे पावने दोनशे किलो गांजा ज्याची अंदाजे किंमत गाडीसह तीस लाख होती. तो पोलिसांनी जप्त केला होता. यातील एक आरोपी पळून जाण्यात यशंस्वी झाला होता. त्यामुळे पोलीसानी अखेर दोन वर्षानतंर त्या फरार आरोपीला संगमनेर येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

2 फेब्रुवारी 2019 रोजी झरेकाठी येथे सकाळी रस्त्याच्या कडेला काही तरुण उभे होते. यावेळी एम एच 14 जी एच 9925 हे चारचाकी वाहन अतिशय वेगाने येताना दिसले व या वाहणात संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यामुळे या तरुणानी आश्वी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती. माहिती मिळताच आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख व त्यावेळी आश्वी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस निरीक्षक अनिल कटके, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे, शांताराम झोडगे, संजय लाटे, मच्छिद्रं शिरसाठ, एकनाथ बर्वे, पांडूरंग कावरे आदि पोलिस कर्मचार्‍यांनी झरेकाठी – आश्वी रस्त्याकडे धाव घेतली.

यावेळी आश्वी खुर्द येथिल अँड. अनिल भोसले यांच्या वस्तीलगत असलेल्या रस्त्यावरुन एक गाडी पोलिसांना येताना दिसली. पोलिसांनी तिकडे आपला मोर्चा वळवला असता गाडीतील एकाने उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस निरीक्षक अनिल कटके व हवालदार अनिल शेगाळे यांनी आरोपी गणेश निवृत्ती लोणारे (रा. जोर्वे. ता. संगमनेर) याला पाठलाग करुन ताब्यात घेतले होते.

दरम्यान गाडी चालकाने प्रवरानदीवर असणार्‍या बंधार्‍यावरील पुलावरुन गाडी अतिशय वेगाने नेत असल्याने या गाडीचा मागील टायरचा पुर्ण चुथडा झाला होता. त्यामुळे आश्वी बुद्रुक येथिल आम्रेश्वर मंदिरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ गाडीचालकाने गाडी टाकून पलायन केले. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये सुमारे पावने दोनशे किलो गांजा मिळुन आला.

याबाबत तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी एक्साईजचे निरीक्षक एस. डी. परदेशी, वी. आर. कर्पे, टी. आर. शेख, ए. एल. मेगाळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन मुद्देमालाची पाहणी करुन पंचनामा करुन गुन्हा दाखल केला होता.

तपासा दरम्यान पोलिसांनी देवराज उर्फ देवा तेजु पवार, सिमा उर्फ गुलाबबाई राजु पंचारिया, जययोगेश्वर उर्फ योगेश दगु उर्फ दत्तु गायकवाड याना अटक केली होती. तर तब्बल दोन वर्ष कसून शोध घेतल्यानंतर फरार आरोपी स्वप्निल अण्णासाहेब कवडे (वय – 29 वर्ष रा. धांदरफळ, तालुका संगमनेर, हल्ली राहणार गोल्डन सिटी गेट संगमनेर) याला संममनेर येथुन पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल वाकचौरे, पोलील कॉस्टेबल विनोद गंभीरे व वाघ यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या