Friday, April 26, 2024
Homeनाशिककुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आज जिल्ह्यात कॅन्डल मार्च

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आज जिल्ह्यात कॅन्डल मार्च

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय कुस्तीगार परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटू आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यात दि. ७ जून रोजी बैठक पार पडली.

- Advertisement -

या बैठकीला कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. कुस्तीपटूंनी या बैठकीत पाच मागण्या केल्या. यामध्ये बृजभूषण सिंह यांना अटकेच्या मागणीवर जोर दिला होता. तसेच आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित केले होते.

Earthquake : दिल्ली-एनसीआरसह शेजारील चार राज्यांमध्ये भूकंपाचे झटके!

भाजप खासदार सत्तेचा गैरवापर करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आज (दि.१३) सायंकाळी ७ वा. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च होणार असल्याची माहिती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी दिली आहे. बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Cyclone Biparjoy : मुंबईत हायअलर्ट; नाशकात वाऱ्याचा वेग वाढला, नगरमध्ये ढगाळ वातावरण

- Advertisment -

ताज्या बातम्या