Thursday, April 25, 2024
HomeनाशिकBlog : कर्करोग बाधित रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका!

Blog : कर्करोग बाधित रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका!

कोरोनाला घाबरून कॅन्सरकडे दुर्लक्ष करू नका, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर अतिरिक्त खबरदारी आणि अथक प्रयत्नांसह तुमच्या सेवेसाठी 24*7 वचनबद्ध आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची काळजी घेऊन कर्करोगाचे निदान व उपचार वेळेत करून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे…

कोविड १९ म्हणजे काय?

- Advertisement -

• डिसेंबर २०१९ मध्ये जगात कोविड १९ ह्या आजाराचा उद्रेक झाला. हा आजार कोरोना ह्या विषाणू पासून संक्रमित झाला असून ह्या आजाराची सुरवात सर्वप्रथम चीन ह्या देशात झाली, नंतर हळू हळू ह्याचे संक्रमण संपूर्ण जगभरात झाले.

• ह्या कोरोना विषाणूचे संपूर्ण नाव “SARS-CoV-२ ” असे आहे. ह्या

• विषाणूमुळे सर्दी सोबतच वेगवेगळे श्वसन संस्थेसंबंधातील तीव्र आजार होऊ शकतात.

• ह्या विषाणूचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लाळ व शिंका किंवा खोकल्याच्या माध्यमातून पसरणाऱ्या स्रावांमधून होतो.

• त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्वसन संस्थेच्या नेमून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे महत्वाचे आहे.

कर्करोग बाधित रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

• कोरोना व्हायरस च्या संक्रमण पासून प्रत्येकानी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु विशेषतः वृद्ध लोक, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, मधुमेह, श्वसन रोग व कर्करोग सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते.

• एक कर्करोग तज्ज्ञ म्हणून कर्करोग बाधित रुग्णांना सांगू इच्छितो, कर्करोग बाधित रुग्णांची प्रतिकार क्षमता साधारण व्यक्तीच्या प्रतिकार क्षमते पेक्षा खूप कमी असते, त्यामुळे कर्करोग बाधित रुग्णांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.

• कोविड १९ पेंडमिकचा कर्करोग बाधित रुग्णांना २ मोठे धोके उभे राहिले आहे. एक म्हणजे निदानात्मक व उपचारात्मक सेवा सुविधांबाबतीत तडजोड व दुसरे म्हणजे कोविड १९ मुळे उभा राहिलेला आरोग्याचा धोका.

• ‘WHOच्या एका संशोधनातून असे लक्षात आले आहे कि ४ आठवड्यांपेक्षा जास्त वेळ कर्करोगाचे उपचार थांबवल्यास कर्करोग बाधितांच्या मृत्युदरात जास्त वाढ होऊ शकते, तसेच कर्करोगाच्या अवस्थेत देखील वाढ होऊ शकते’.

• त्यामुळे कर्करोगाच्या निदानात व उपचारात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा टाळावा.

कोरोनाचे विशेष लक्षणे

• कर्करोग बाधित रुग्णांना कोविड १९ होण्याची शक्यता अधिक आहे साधारण कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 14 दिवसांच्या आत रुग्णाला कोरोना चे लक्षण आंधळ्याला लागतात.

• ताप

• कोरडा खोकला

• थकवा जाणवणे

• श्वसनास त्रास होणे

• छातीत दुखणे

• डोके दुखी

• सांधे दुखी

• घसा तुरट पडणे किंवा चव जाणे

• डायरिया

• डोळ्यांखाली आग होणे

• अंग दुखणे

• त्वचेवर पुरळ

कोरोना पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर सुरक्षित अंतर, हातांची स्वच्छता, डोळ्यांना, तोंडाला किंवा चेहऱ्याला हातांचा डायरेक्ट संपर्क टाळणे इत्यादी नियमावलीचा काटेकोर पद्धतीने पालन करणे गरजेचे आहे.

कर्करोग बाधितांनी कोणता आहार घ्यावा?

• आतड्यांच्या आरोग्यावर लक्ष द्या- आतड्यांची काळजी घेण्यासाठी आम्बली पदार्थ खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे दिवसातून दोन वेळा तरी आम्बली पदार्थ खावे.

• अँटी इंफ्लामेंटोरी फूड – कर्करोगामुळे पेशींवर आलेली सूज कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लमेटोरी ज्यात विशेषतः ओमेगा ३ फॅटी ऍसिड ने परिपूर्ण असलेले अन्नपदार्थ आठवड्यातून तीनदा घेणे गरजेचे आहे.

• प्रतिकार शक्ती वाढविण्या साठी चे पदार्थ – निसर्गातील औषधी वनस्पती व मसाले माणसाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम पद्धतीने मदत करतात. शरीरामध्ये कोणत्याही विषाणूचा प्रतिकार करण्या साठी रोजच्या खाण्यात चुटकीभर औषधीपदार्थांचा समावेश करावा ज्यामध्ये ब्लॅक पेपर, व्हाईट पेपर, आले, लहसून, हळद, जेष्टमध, यांसारखे पदार्थांचा समावेश करावा. तसेच मशरूम, ब्रोकोली भोपळी मिरची, इत्यादी भाज्या हृदयाच्या आरोग्य सोबतच प्रतीकर शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

• द्रव पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन- द्रव पदार्थ शरीरातील उष्णता व थकवा कमी करण्यासाठी अधिक उपयोगी ठरतात. कर्करोग रुग्णांनी दिवसातून कमीत कमी २ लिटर तेही द्रव पदार्थांचा समावेश करावा ज्यामध्ये विशेषतः पाणी, जूस, सूप, लो कॅलोरीस ड्रिंक जसे बदामाचे दूध किंवा मटणाचा रस्सा याचा समावेश असणे गरजेचे आहे.

• ‘क’ जीवनसत्व उक्त पदार्थांचे सेवन करावे.

कर्करोग बाधितांनी कोणता व्यायाम करावा?

•व्यायाम हा शरीरासाठी डिप्रेशन, ताण-तणाव, चिंताग्रस्तता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी ठरते, त्याच बरोबर हाय ब्लड प्रेशर, व डायबिटीस सारख्या आजारामध्ये शरीराची स्तिथी नॉर्मल करण्यासाठी मदत करते. विशेषतः सूर्यनमस्कार व योग शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

कर्करोग बाधितांनी कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्याआधी कोविड टेस्ट करावी का?

• होय, कर्करोग बाधितांनी उपचार घेण्याआधी जर काही लक्षणे आढळून येत असेल तर कोविड १९ ची तपासणी करणे गरजेचे आहे. विशेषतः शस्रक्रिया करण्याआधी प्रत्येकानी टेस्ट करणे आवश्यक आहे.

कर्करोग बाधितांना कोविड १९ झाल्यास?

• कर्करोगाच्या उपचार दरम्यान रुग्णाची प्रतिकार शक्ती खूप मंदावलेली असते. अश्या परिस्थितीत कोविड १९ चा संसर्ग रुग्णास झाल्यास पुढील १५ दिवस रुग्णाचे सर्व प्रकारचे उपचार अर्थात किमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया थांबवावी लागते. काही अत्यावश्यक शस्त्रक्रियाच कोविड दरम्यान केल्या जातात.

• दरम्यान ह्या १५ दिवसात रुग्णाच्या प्रतिकार शक्तीसोबतच इतरही आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वपूर्ण असते. ह्या काळात रुग्णास सुव्यवस्थित उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका अधिक वाढतो.

• योग्य ती काळजी घेऊन रुग्ण कोविड १९ मधून पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसेच कर्करोग बाधित रुग्ण कोविड १९ ह्या आजारातून बरा झाल्या नंतर १५ दिवसांनी त्याचे नियमित उपचार देखील घेऊ शकतो.

कर्करोगबाधितांनी कोविड १९ चे व्हॅक्सिन घ्यावे का?

• होय. निश्चितच कर्करोगबाधितांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड १९ चे व्हॅक्सिन घावे. व्हॅक्सिन घेतल्याचे कोणतेही मोठे दुष्परिणाम रुग्णावर दिसून येत नाही. थोडे फार परिणाम जे दिसून येतात ते २ किंवा 3 दिवसात बरे होऊन त्याचे आयुष्य पुर्वव्रत होते.

शास्त्रक्रियेनंतर किती दिवसांनी कोरोनाची व्हॅसिसिन घेऊ शकतो. कर्करोग बाधित रुग्णांसाठी व्हॅसिसिनघेणे सुरक्षित आहे का?

• जर रुग्ण शास्त्रक्रियेनंतर ३ ते ४ आठवड्याने शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल व त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्ण कोरोनाची व्हॅसिसिन घेऊ शकतो .

- Advertisment -

ताज्या बातम्या