Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक'इतक्या'कोटी रुपयांची कामे रद्द

‘इतक्या’कोटी रुपयांची कामे रद्द

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघात होऊ घातलेल्या पाच कोटींच्या कामांना जिल्हा परिषद प्रशासनाच्या (Zilla Parishad Administration) चुकीमुळे खो बसल्याचा आरोप करत उपोषणास बसलेल्या आ. हिरामण खोसकर ( MLA Hirman Khoskar ) यांची पालकमंत्री दादा भुसे यांना मनधरणी करण्यात यश आले आहे. आ. खोसकर यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना बरोबर घेत थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत रद्द कामांची चौकशी करण्याची मागणी केली.

- Advertisement -

या संदर्भातील सर्व पुरव्यांची फाईल खोसकर यांनी सीईओ मित्तल यांच्यासमोर सादर करत तब्बल दीड तास चर्चा केली. ग्रामविकास विभागाने मुलभूत सुविधांच्या कामांना स्थगिती दिल्यामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार खोसकर यांची तब्बल 5 कोटी रुपयांची 54 कामे रद्द झाली आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केलेली असताना केवळ अधिकार्यांच्या वेळकाढू धोरणामुळे ही कामे रद्द झाल्याचा आरोप आमदार खोसकार यांनी केला.

तोडगा काढण्याचे आश्वासन

दरम्यान, पालकमंत्री भुसे यांनी मध्यस्थी करत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, खोसकर यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेत याविषयी चर्चा केली. कागदपत्रांची फाईल स्वत: सीईओंकदे सुपूर्द केली. त्यात 54 कामांसाठी त्यांनी दिलेले कागदपत्र जोडले आहेत.

आमदारांचे म्हणणे ऐकूण घेत सीईओ मित्तल यांनी याप्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेच्या तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी एका कामामुळे या संपूर्ण कामांना स्थगिती दिली. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आमदार खोसकर यांनी यावेळी केली. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या