Wednesday, April 24, 2024
Homeधुळेशिरपूर येथील कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

शिरपूर येथील कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

धुळे – प्रतिनिधी Dhule

नाहरकत दाखला तयार करून देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कालवा निरीक्षकाला (ACB) एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज सकाळी ही सापळा कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

तक्रारदार यांची मौजे पिंपळे (ता.शिरपूर) (Shirpur) येथील शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग धुळे यांच्याकडून तयार करून देण्याच्या मोबदल्यात शिरपूर पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक तुषार दिलीप दलाल ( वय- 40 रा.प्लॉट क्र.19 पित्रेश्वर कॉलनी शिरपूर) यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

त्या अनुषंगाने आज सकाळी धुळे एसीबीने सापळा कारवाई केली. तुषार दलाल यांनी एक हजार रुपये स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी स्वीकारले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई पोलीस उप अधिक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, हवालदार जयंत साळवे, शरद काटके, कैलास जोहरे, राजन कदम, पुरुषोत्तम सोनवणे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, भुषण शेटे, संदीप कदम, महेश मोरे, संतोष पावरा, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या