Friday, April 26, 2024
Homeनगरदुरुस्ती केल्याने यंदा मोठा पूर येऊनही कौठा येथील कालवा राहिला धोकामुक्त

दुरुस्ती केल्याने यंदा मोठा पूर येऊनही कौठा येथील कालवा राहिला धोकामुक्त

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील कौठा परीसरातील मुळा उजव्या कालव्यावरील 45 नालावरील कालवा दुरुस्तीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दुरुस्त केल्याने यावर्षी या परिसरात मोठा पूर येऊनही मुळा उजव्या कालव्याला कोणताही धोका झाला नाही त्याबद्दल कौठा, देडगाव ग्रामस्थांनी नामदार शंकरराव गडाख यांचे विशेष आभार मानले आहेत.

- Advertisement -

मुळा उजवा कालवा चांदा, कौठा, देडगाव परिसरातून वाहत जातो. या गावांसाठी कालवा वरदान ठरला आहे. मात्र कौठा जवळ 45 नाला या ठिकाणी पावसाळ्यात या नाल्याला पूर आल्यानंतर मुळा कालव्याचा भराव वाहून जात असे.त्यामुळे मुळा कालव्याचे आवर्तन सोडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब कौठा, देडगाव ग्रामस्थांनी नामदार शंकरराव गडाख यांच्या निदर्शनास आणून दिली. गतवर्षी नामदार गडाखांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकार्‍यांना आदेश देत या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे येथील काम पूर्ण झाले.

दोन दिवसापुर्वी कौठा परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने या ठिकाणी दरवेळेपेक्षाही मोठा पूर आला. मात्र यावेळी याठिकाणी मुळा उजव्या कालव्याला कुठलाही धोका झाला नाही. कौठा गावचे माजी सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष रावसाहेब काळे, देडगाव पाणी वापर सोसायटीचे चेअरमन संतोष तांबे यांच्यासह शेतकर्‍यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता कालवा संरक्षक भिंत दोन्ही बाजुंनी व्यवस्थित होती. नामदार गडाखांनी विशेष लक्ष देऊन हा रखडलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कौठा, देडगाव परिसरातील शेतकर्‍यांनी त्यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या