Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedलहान मुलांच्या लसीकरणासाठी शिबिरांचा आधार

लहान मुलांच्या लसीकरणासाठी शिबिरांचा आधार

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) प्रतिबंधासाठी बारा ते चौदा वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination of children) सुरू करण्यात आले आहे. लसीकरणासाठी मुलांची विविध केंद्रांवर गर्दी होत आहे. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या निर्देशानुसार बारा ते चौदा या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० दरम्यान जन्म झालेल्या बालकांना लस देण्यात येत आहे. या मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यावर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने व आरोग्य (Medical officer) वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्य केंद्रात लसीकरण शिबीरांचे आयोजन केले जात आहे. (CIDCO) सिडको एन-४ येथील बीएसजीएम स्कूल, पालिकेचे अंबिकानगर अंतर्गत असलेले आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात आले. दिवसभरात १८० मुलांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.

कोणती लस दिली जाईल?

या मुलांना हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. कंपनीची कोर्बेवॅक्स लस दिली जाणार आहे.

दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जाईल

ही लस करोनाच्या बचावापासून ९० टक्के प्रभावी आहे

या लसीची चाचणी बीटा आणि डेल्टा व्हेरियंटवर (Beta and Delta variants) करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या