Friday, April 26, 2024
Homeनाशिककृषि संजीवनी योजनेंतर्गत मोहीम सुरु

कृषि संजीवनी योजनेंतर्गत मोहीम सुरु

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

खरीप हंगाम (Kharp Season) यशस्वी करण्यासाठी मालेगाव उपविभागातील (Malegaon subdivision) मालेगाव (malegaon), सटाणा (satana) व नांदगाव तालुक्यात सी. 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषि संजीवनी योजनेंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्यासाठी कृषि विभागातील कर्मचारी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणार असून शेतकरी बांधवानी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कृषि संजीवनी योजनेच्या (Krishi Sanjeevani Yojana) माध्यमातून मालेगाव उपविभागातील तालुक्यांमध्ये ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा शुभारंभ दि. 25 जून रोजी चंदनपुरी येथे शेतकरी मेळावा, बिजप्रक्रिया व पीक प्रात्याक्षिक कार्यक्रमाद्वारे केला जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद कृषि अधिकारी, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ, कृषिमित्र शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.

दि. 25 जूनरोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान, प्रसार, मुल्य साखळी बळकटीकरण आणि दि. 26 जूनरोजी पौष्टीक तृणधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई पिकांचे आहारातील महत्व इत्यादी विषयांवर चर्चा होऊन मार्गदर्शन करत तृणधन्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. दि. 27 जूनरोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरणासाठी महिलांचे चर्चासत्र व कौशल्याधारीत महिला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 28 जूनरोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर, 10 टक्के रासायनिक खतांच्या बचतीबाबत माहिती देऊन खत बचत दिन साजरा केला जाईल, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली आहे.

दि. 29 जूनरोजी प्रगतीशील शेतकर्‍यांना (रिसोर्स पर्सन) आमंत्रित करुन क्षेत्रिय भेटी तसेच युट्यूबच्या माध्यमातून प्रगतीशील संवाददिन साजरा करण्यात येणार आहे. दि. 30 जूनरोजी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन या विषयी मार्गदर्शन करण्याबरोबरच व्यवसाय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येणार आहे. मोहिमेच्या माध्यमातून उपविभागातील 412 गावात शेतकरी प्रशिक्षण, पिक प्रात्याक्षिक, शेतकरी मेळावे, शेतीशाळांचे आयोजन व शिवार फेर्‍यांचा कार्यक्रम असे आठवडाभराचे नियोजन करण्यात आले आहे.=

शेतकर्‍यांना रुंद सरीवरंबा तंत्रज्ञान, बिजप्रक्रिया, आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, सुधारीत भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड, कडधान्य, आंतरपिक लागवड, विकेल ते पिकेल अभियान, महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड तसेच खरीप हंगामातील मुख्य पिकांच्या किडरोग नियंत्रणाच्या उपाययोजना विषयी माहिती देण्यात येणार आहे.

गावपातळीवर कृषि विभाग, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व रिसोर्स बँक शेतकर्‍यांशी समन्वय साधून शिवार फेर्‍या, शेतीशाळा व गावातील कृषीविषयक नाविन्यपुर्वक उपक्रमांना भेटी देणार आहेत. तसेच पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत उत्सुक उद्योजक व शेतकरी बांधवांचे अर्ज क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांमार्फत भरुन घेतले जाणार आहेत.

संपूर्ण मोहीम कालावधीत कृषि विभाग व आत्मा नाशिक यांच्या संयुक्त वतीने फेसबुक लाईव्ह व युट्यूब लाईव्ह लिंकवर जिल्हा तसेच उपविभाग स्तरावरुन शेतकर्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 26 जूनरोजी पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्व व प्रक्रिया उद्योगांसंबधी वडेल कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर हे ऑनलाईन फेसबुक व युट्यूब लाईव्ह लिंकवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतील.

कृषि विद्यापीठ, केंद्रीय संशोधन संस्थांनी संशोधिि केलेले अद्यावत कृषि तंत्रज्ञान तसेच रिसोर्स बँकेचे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जुलैरोजी कृषी दिनानिमित्त तालुकास्तरावर कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप होईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या