Friday, April 26, 2024
Homeनगरछावणी मंडळ हद्दीतील विविध प्रश्न; आ. जगताप यांनी वेधले संरक्षण मंत्र्यांचे लक्ष

छावणी मंडळ हद्दीतील विविध प्रश्न; आ. जगताप यांनी वेधले संरक्षण मंत्र्यांचे लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर छावणी मंडळ हद्दीतील विविध प्रश्नांसंदर्भात आ. संग्राम जगताप यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधले. प्रवरा नगर येथे आ.जगताप यांनी संरक्षण मंत्री सिंह यांना निवेदन दिले.

- Advertisement -

निवेदनात आ. जगताप यांनी म्हटले, शहर विधानसभा मतदारसंघात नगर शहरासह भिंगार उपनगरात असलेल्या छावणी परिषद क्षेत्राचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेला सीना नदी आणि पूर्वेला लष्कराच्या जमिनी आणि संस्थांना लागून आहे. नगर शहर हे एक विकसनशील शहर म्हणून उदयास येत आहे. नगर शहरात आणि शहराच्या सीमेवर लष्कराच्या आस्थापना मोठ्या प्रमाणात आहेत.

या संस्थांकडे संरक्षण विभागाच्या नियमावलीनुसार शहरातील नागरिक आणि विकासकांची घरे आणि वैयक्तिक मालमत्ता आहेत. यानुसार, एखाद्याला लष्करी आस्थापनेजवळ एक मजली इमारत बांधायची असल्यास 100 मीटर आणि बहुमजली इमारतीसाठी 500 मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. कडक नियमांमुळे नागरिकांना त्या जागांचा विकास योग्य प्रकारे करता येत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शहराचा विस्तार आणि परिणामी विकास मर्यादित झाला आहे. तसेच नगर शहरासह भिंगार उपनगरात छावणी मंडळ क्षेत्राचा समावेश होतो.

या परिसरात असलेले बेल्हेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर असून, येथे दररोज भाविकांची गर्दी असते. वीर गोगादेव महाराज मंदिर आहे. हे मंदिर एक महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. अनेक भाविक या मंदिराला भेट देतात, ही दोन्ही मंदिरे संरक्षण विभागाच्या अंतर्गत अहमदनगर छावणी मंडळाच्या आवारात येतात. सुरक्षेसाठी व इतर कारणांमुळे हे मंदिर वर्षातून अनेकवेळा बंद ठेवले जाते, असे आ. जगताप यांनी मंत्री सिंग यांच्या निदर्शनास आणून दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या