Thursday, April 25, 2024
Homeनगरगोवंश जातीच्या 42 वासरासह 10 लाख 62 हजाराचा माल जप्त

गोवंश जातीच्या 42 वासरासह 10 लाख 62 हजाराचा माल जप्त

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गोवंश जातीची 42 वासरे घेऊन जाताना दोन पिकअप वाहनासह 4 आरोपीना आश्वी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत आश्वी पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे याना गुप्त बातमीदारामार्फत सादतपूर शिवारातील गोगलगाव – सातपूर रस्त्यावर दोन पिकेअप वाहनातून गोवंश जनावरे निर्दयीपणे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण दैमिवाळ, व्ही. एम. गायकवाड व पोलीस नाईक एच. जी. शेख यांना याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आदेश मिळताच पोलीस पथक गोगलगाव – सातपूर रस्त्यावर दाखल झाले व त्यांनी विकास म्हस्के, रविंद्र चौधरी, रोहित पानसरे यांना मदतीला घेऊन गोगलगाव – सातपूर रस्त्यावर असलेल्या दोन पिकअप वाहनांवर छापा टाकला.

यावेळी एम. एच. 17 बी वाय 5399 या पिकअप वाहनात 8 ते 15 दिवसांची 42 वासरे अत्यंत निर्दयीपणे भरलेली आढळून आली. तसेच एम. एच. 12. एमवी 1506 या पिक अप वाहणात पांढर्‍या व विटकरी रंगाची जर्शी गाय मयत आढळून आली. त्यामुळे वाहणात असलेल्या व्यक्तीकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे 10 लाख रुपये किंमतीची दोन पिकअप वाहने, 50 हजार रुपये किंमतीची 42 जर्शी वासरे व 12 हजार रुपये किंमतीची मयत जर्शी गाय यांना पोलिसांनी जप्त केले.

दरम्यान पोलिसांनी आरोपी हुसेन इब्राहिम तांबोळी (वय – 38), अब्दूल ताहिर इस्माईल कुरेशी (वय 27), रेहान महंमद आयात कुरेशी (वय 22) व सालीत आयुब कुरेशी (वय 20) सर्व राहणार ममदापूर, ता. राहाता यांच्या विरूद्ध आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नबंर 142/2023 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(अ)(1) सह 9, प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 3, 11 तसेच भादंवी कलम 429 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. बी. भाग्यवान हे आहे. गोवंश वासरे मांची येथिल गो-शाळेत पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या