Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात वासरू दगावले; तीन दिवसात दुसरी घटना

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू दगावले; तीन दिवसात दुसरी घटना

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) करंजवण (Karanjvan) येथे बिबट्याने रात्री बारा वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच रवींद्र मोरे (Ravindra More) यांच्या वस्तीतील वासरावर हल्ला केला…

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी करंजवण येथील अनिल कोंड यांच्या वस्तीवरील वासरावर हल्ला करून वासरू फस्त केल्याची घटना ताजी असताना बिबट्याने पुन्हा वासरू ठार केले आहे.

अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; ‘पाहा’ थक्क करणारा व्हिडीओ…

त्यामुळे करंजवण परिसरात (Karanjvan Area) तीन दिवसात सलग दोन हल्ले करून दोन वासरे ठार केली आहे. त्यामुळे नागरिकांना मध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वनविभागाने (Forest Department) त्वरित पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या बिबटे मुक्तसंचार करीत असल्यामुळे नागरिक दिवसेंदिवस भयभीत होत आहे. त्यामुळे बिबट्यांची दहशतीची समीकरण पध्दती केव्हा संपणार? असा सवाल निर्माण केला जात आहे.

Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात त्यामध्ये लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, अवनखेड, करंजवण, दहेगाव, वागळूद, परमोरी आदी.भागात बिबट्यांचे मुक्त संचार पध्दती नागरिकांना रोज पाहायला मिळत आहे. आतापर्यंत बिबट्यांनी लहान बालके, बकऱ्या, श्वान, गाई, वासरे, घोडे आदींना आपले भक्ष बनविले आहे. सध्या खरीप हंगामातील शेतीतील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून अचानक बिबट्या हल्ला करील, या भीतीने बळीराजा त्रासून गेला आहे.

Video : …तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

करंजवण परिसरात पिंजरा लावण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. बिबट्याने हल्ले केले त्या ठिकाणी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा. सध्या शाळा सुरु असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

– रविंद्र मोरे, माजी उपसरपंच, करंजवण.

- Advertisment -

ताज्या बातम्या