Saturday, April 27, 2024
Homeनगरकॅडबरीतून फूड पॉयझनिंग

कॅडबरीतून फूड पॉयझनिंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील एका डेअरी व बेकरी दुकानदाराने कालबाह्य झालेल्या व खाण्या योग्य नसलेल्या कॅडबरीची विक्री केली. त्या कॅडबरी खाल्ल्यामुळे दोन लहान मुलांना फूड पॉयझनिंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात भूषण भिंगारादिवे यांनी अन्न प्रशासनाकडे तक्रार केली आहे. भिंगारदिवे यांच्या बहिणीने रविवारी एका दुकानातून कॅडबरी घेतल्या. त्यातील कॅडबरी खाल्ल्यानंतर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा व चार वर्षांच्या मुलीला उलट्या सुरू झाल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी हा त्रास फूड पॉयझनिंगमुळे झाल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या