Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरशेतकऱ्यांच्या केबल व मोटार चोरी करणाऱ्या टोळी नेवासा पोलिसांकडून जेरबंद

शेतकऱ्यांच्या केबल व मोटार चोरी करणाऱ्या टोळी नेवासा पोलिसांकडून जेरबंद

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केबल व मोटार चोरी करणाऱ्या टोळीला नेवासा पोलिसांनी जेरबंद केले असून भेंडा व शेवगाव येथील पाच आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील दोन वर्षापासुन भेंडा-कुकाणा या प्रमुख गावांसह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरीबाबत गुन्हे उघडकीस येत नव्हते.मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांचे नेतृत्वाखाली नेवासा पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मोटार व केबल चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. मोटार व चोरी गेल्याबाबत फिर्यादीवरुन नेवासा पोलिस स्टेशनला गु.र.नं. २१४/२०२१ भा.द.वि. कलम ३७९, गु.र.नं.३४७/२०२१ भादंवि कलम ३७९,गु.र.नं. ३७६ / २०२१ भादंवि कलम ३७९, गु.र.नं. ३४३ / २०२१ भादंवि कलम ३७९, गु.र.नं. ४५५ / २०२१ भादंवि कलम ३७९, गु.र.नं. ४१ / २०२१भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल होते.

पोलिस निरीक्षक विजय करे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नेवासा परिसरात केबल व मोटार चोरी करणाऱ्या चोरट्यांना नेवासा पोलिसांना अटक करण्यात यश आले असुन मोटार व केबल चोरी करणारे एकुण पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात आरोपी १)मोहन आप्पासाहेब जाधव रा. भेंडा ता. नेवासा २) करण सिताराम जाधव रा. भेंडा ता. नेवासा ३) गणेश उर्फ सोन्या अशोक गव्हाणे रा.भेंडा ता.नेवासा ४) विष्णु चंदु कडमिंचे रा. रामनगर शेवगाव ता. शेवगाव ५) महेंद्र नामदेव जाधव रा. भेंडा ता. नेवासा यांना अटक केली असुन त्यांचेकडुन नेवासा पोलिस स्टेशनला गुन्ह्यात चोरी गेलेल्या केबल व मोटार असा एकुण 35,000/- रुपये किंमतीच्या इलेकट्रीक मोटार व केबल हस्तगत करण्यात आल्या आहे.

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपुर डॉ. दिपाली काळे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक भरत दाते, पोह. ठोंबरे, पो. हे कॉ. शिंदे, पोना. तमनर, पोना. देवकाते, पोना. राहुल यादव, पोना. महेश कचे, पोशि. अंबादास गिते, वशीम इनामदार, शाम गुंजाळ, गणेश इथापे,अशोक कुदळे यांनी यशस्वी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या