Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशरेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

दिल्ली | Delhi

दिवाळीनिमित्त केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट जाहीर केली आहे. यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

- Advertisement -

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात साजरी होणार आहे.

हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी १८३२.०९ इतका बोजा पडणार आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी पेमेंट म्हणून दरमहा ७००० रुपये दिले जातात. ७८ दिवसांनुसार कर्मचार्‍यांना बोनस म्हणून रु. १७,९५१ दिले जातील. गेल्या वर्षी रेल्वेने आपल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला होता. रेल्वे कर्मचार्‍याला ३० दिवसात ७००० रुपये बोनस मिळतो. अशा परिस्थितीत ७८ दिवसांसाठी एका कर्मचाऱ्याला सुमारे १८००० रुपयांचा बोनस मिळेल.

बोनसच्या निर्णयासह आजच्या बौठकीत तेल वितरण कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यासह मंजूरी देण्यात आली आहे. जगभरात एलपीजीच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांनावर आर्थिक ताण पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि वाढत्या किमतींचा बोजा सामान्यांवर न पडण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या