Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘सीए’ परीक्षा २१ मे पासून

‘सीए’ परीक्षा २१ मे पासून

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

सीए मे परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून वेळापत्रक आयसीएआयच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंटरमीडिएट आणि फायनल अशा दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहेत.

- Advertisement -

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए मे परीक्षा २०२१ चे वेळापत्रक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केले आहे. हे वेळापत्रक इंटरमीडिएट आणि फायनल अशा दोन्ही अभ्यासक्रमांसाठी आहे. हे वेळापत्रक आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळ icai.org वर उपलब्ध आहे.

परीक्षा २१ मे पासून सुरू होणार आहे आणि ६ जून २०२१ रोजी संपणार आहे. परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. सर्व दिवशी सर्व पेपर्ससाठी दुपारी ३ ते सायंकाळी ६ असा परीक्षेचा कालावधी असेल. अपवाद केवळ फायनल कोर्स पेपरचा आहे. फाइनल कोर्स ६ विषयाची परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या