Friday, April 26, 2024
HomeराजकीयBengal Bypoll : ममतांविरोधात भाजपाकडून प्रियांका टिब्रेवाल

Bengal Bypoll : ममतांविरोधात भाजपाकडून प्रियांका टिब्रेवाल

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालच्या बहुचर्चित भवानीपुर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (by-election in the Bhabanipur Assembly constituency) राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या विरोधात भाजपने (BJP) वकील प्रियांका टिब्रेवाल (Priyanka Tibrewa) यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक होत आहे. (bypolls in West Bengal)

- Advertisement -

या जागेसाठी भाजप एखाद्या वरिष्ठ नेत्याला उमेदवारी देईल, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी महिला कार्डावरच विश्वास दाखवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरसह तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, शमशेरगंजमध्ये (Samserganj) भाजपाने मिलन घोष तर जंगीपूरमध्ये (Jangipur) सुजित दास यांना उमेदवारी दिली आहे.

२०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून (Bhabanipur constituency) विजयी झाल्या होत्या. यावर्षी झालेल्या विधानसभासभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर सोडत नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात प्रियांका टिब्रेवाल यांचा तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला होता.

कोण आहे प्रियांका टिब्रेवाल?

भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या कायदे विषयक सल्लागार असलेल्या प्रियंका टिब्रेवाल यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले प्रेरणास्थान आणि राजकारणातील आदर्श मानतात. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या सल्ल्यानंतरच प्रियंका भाजपमध्ये सामील झाल्या. २०१५ मध्ये, प्रियांका टिब्रेवाल यांनी भाजपकडून कोलकाता नगरपरिषदेची निवडणूकही लढली होती. त्या प्रभाग क्रमांक ५८ (अँटली) मधून उभ्या होत्या. परंतु तृणमूल काँग्रेसच्या स्वपन समदार यांच्याकडून त्यांचा पराभूत झाला होता. भाजपमधील सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आणि ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष करण्यात आले.

टिबरेवाल यांनी २०२१ मध्ये अँटलीमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, टीएमसीचे स्वर्ण कमल साहा यांच्याकडून त्यांचा ५८,२५७ मतांनी पराभव झाला होता. टिब्रेवाल यांचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण वेलँड गोल्डस्मिथ स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर, २००७ मध्ये त्यांनी कोलकात्ता विद्यापीठांतर्गत असलेल्या हजरा लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. यानंतर त्यांनी थायलंडमधून एमबीएही केले आहे.

भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि हरदीपसिंग पुरी यांचा समावेश करण्यात आला. बिहारचे मंत्री शाहनवाज हुसैन, खा. मनोज तिवारी, बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, शुभेंदू अधिकारी, राहुल सिन्हा, बाबुल सुप्रियो, लॉकेट चटर्जी, रूपा गांगुली, दिनेश त्रिवेदी आणि स्वपन दासगुप्ता यांचाही यादीत समावेश आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी असलेल्या कैलास विजयवर्गीय यांना या यादीत स्थान मिळाले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या