Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याByPoll Results Live : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह ११ राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकालाचे...

ByPoll Results Live : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह ११ राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकालाचे अपडेट

दिल्ली | Delhi

मध्य प्रदेशात २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. पक्षांतरामुळे आमदारकी गेल्यानं मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये पाच जागांवर भाजप आघाडीवर

यूपीच्या सात विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. यात पाच जागांवर भाजप, एका जागेवर समाजवादी पार्टी आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार धनंजय सिंह मल्हनी जागेवर आघाडीवर आहेत. नौगाव सदात या जागेवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. तसेच देवरिया सदर, बुलंदशहर, बांगरमऊ, घाटमपूर आणि तुंडला येथे भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.

नागालँड: अपक्ष उमेदवार आघाडीवरनागालँडच्या दक्षिण अंगामी -१ आणि पुंगारो किफाइर विधानसभा जागांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीनुसार अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

तेलंगणात भाजप आघाडीवर

तेलंगणाच्या दुब्बक विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीनुसार भाजप पक्ष आघाडीवर आहे.

छत्तीसगड: चौथ्या फेरीतही कॉंग्रेसचे डॉ. केके ध्रुव आघाडीवर

चौथ्या फेरीतही कॉंग्रेसचे उमेदवार केके ध्रुव आघाडीवरचौथ्या फेरीत कॉंग्रेसचे डॉ. केके ध्रुव यांना 4,993 मते, 3,282 मतांनी आघाडीवर, भाजपचे गंभीर सिंह यांना 1,711 मते.

- Advertisment -

ताज्या बातम्या