Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशपाहा, सर्व राज्यातील पोटनिवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

पाहा, सर्व राज्यातील पोटनिवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

नवी दिल्ली

बिहारमध्ये एनडीएची सत्ता आली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमध्येही भाजपने वर्चस्व मिळवले आहे.

- Advertisement -

११ राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मतदारांनी सत्ताधारी पक्षावरच विश्वास दाखवला. एकट्या मध्य प्रदेशातील २८ पैकी १९ जागा भाजपने जिंकल्या. तर उर्वरित १० राज्यांमध्ये भाजपने लढवलेल्या २५ पैकी २१ जागांवर विजय मिळवला.

मध्य प्रदेश -जागा 28

भाजपा -19

काँग्रेस – 9

छत्तीसगड – जागा 1

काँग्रेस -1

गुजरात -जागा 8

भाजपा – 8

हरियाणा -जागा 1

काँग्रेस – 1

झारखंड- जागा 2

काँग्रेस -1

झारखंड मुक्ती मोर्चा 1

कर्नाटक – जागा 2

भाजप 2

उत्तर प्रदेश – जागा 7

भाजप -6

सपा -1

तेलंगणा जागा 1

भाजप 1

ओडिसा जागा 2

बीजू जनता दल 2

११ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला काहीही चमत्कार दाखवता आला नाही. लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पूर्ण ताकदीने कमबॅक करणार अशी अपेक्षा होती. पण मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या महत्त्वाच्या राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला काहीही करता आलं नाही. मध्य प्रदेशात तर काँग्रेसकडे मोठी संधी होती.

गुजरातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व ८ जागा जिंकल्या, तर उत्तर प्रदेशातही ७ पैकी ६ जागांवर भाजपने झेंडा फडकवला. काँग्रेसने छत्तीसगड, झारखंड आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला, तर गुजरात, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि कर्नाटकात पराभव स्वीकारावा लागला. मणिपूरसारख्या छोट्या राज्यातही भाजपने दणदणीत विजय मिळवला. ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने ३, तर एका भाजप समर्थित उमेदवाराने विजय मिळवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या