Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचा नेमका भाव

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचा नेमका भाव

मुंबई | Mumbai

आज अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya)… अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील मोठा आणि शुभ सण असा मानला जातो. त्यामुळे हिंदू धर्मिय या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी पसंती देतात. या दिवशी सोनं खरेदी केल्याने समृद्धी येते असं म्हणतात. आजच्या या शुभ दिवशी सोने-चांदी खरेदीला जाण्याआधी आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

- Advertisement -

पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा ‘आर्ची’चे खास फोटो

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील भाव

मुंबई

२२ कॅरेट- ४७ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट- ५१ हजार ५१० रुपये प्रति १० ग्रॅम

पुणे

२२ कॅरेट- ४७ हजार २८० रुपये प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट- ५१ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम

नाशिक

२२ कॅरेट- ४७ हजार २८० रुपये प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट- ५१ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम

‘प्रार्थना’चं निखळ सौंदर्य हिरव्या पैठणीत खुललं, पाहा PHOTO

दरम्यान काही दिवसांपूर्वी ५८ हजार रुपये प्रति १० ग्रॅम एवढा सोन्याचा दर झाला होता. मात्र आता तो दर पुन्हा एकदा कमी झाला असून ५१ हजार ५९० रुपये पर्यंत आला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचा दर अजून वाढण्याची शक्यता असून येणाऱ्या काही महिन्यात तो दर ६० हजारापर्यंत देखील जाऊ शकतो, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेटवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहीलेलं असतं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या