Friday, April 26, 2024
Homeनगरकांदा खरेदीसाठी नाफेडने स्वतःहून पुढाकार घ्यावा - राज्यमंत्री बच्चू कडू

कांदा खरेदीसाठी नाफेडने स्वतःहून पुढाकार घ्यावा – राज्यमंत्री बच्चू कडू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कांदा खरेदी संदर्भात केंद्राची भूमिका गुलदस्त्यात आहे. फेडरेशन ज्याप्रमाणे तूर, सोयाबीन खरेदी करते, त्याप्रमाणे नाफेडने कांदा खरेदीसाठी स्वतःहून पुढाकार घेतल्यास चांगला भाव मिळू शकेल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

- Advertisement -

श्रीरामपुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अभिजित पोटे, आप्पासाहेब ढुस, विवेक माटा, बाळासाहेब पटारे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री कडू म्हणाले, शेतमालाला हमीभाव देता येत नसेल तर पेरणी ते कापणीपर्यंत जो खर्च येतो तो खर्च रोजगार हमी योजनेतून देण्यात यावा. जिल्हा नियोजनात याची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू.सोयाबीन व तूर आयात करून आपल्याकडील भाव कमी केले. आयात करून कोणाचे पोट भरायचे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आपण आपल्या जिल्ह्यात 1 जूनपासून बियाणे महोत्सव घेणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी 4 लाख क्विंटल बियाणे साठवले आहे. त्यामुळे खरिपाच्या बियाण्यांसाठी कंपन्यांकडे जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. भोंगा, हनुमान चालिसा, मंदिर, मस्जिद आणि ईडी सोडून केंद्राचा काही कार्यक्रम दिसत नाही. स्वतःला वाजवता येत नाही तर दुसर्‍याला वाजवायला लावायचे. हनुमान चालिसा आपल्याला म्हणता येत नाही तर दुसर्‍याला म्हणायला लावायचे, अशी टीका त्यांनी केंद्रासह भाजप नेत्यांवर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या