Friday, April 26, 2024
Homeनाशिकबिजनेस बँकेसह प्रेस सोसायटीची निवडणूक स्थगित; इच्छुकांचा हिरमोड

बिजनेस बँकेसह प्रेस सोसायटीची निवडणूक स्थगित; इच्छुकांचा हिरमोड

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील बिजनेस बँकेची निवडणूक (Business Bank Election) येत्या 31 जुलै रोजी होणार होती. परंतु ही निवडणूक राज्य शासनाच्या आदेशानुसार व राज्यात पूर (Flood) परिस्थिती असल्याने स्थगित करण्यात आली आहे…

- Advertisement -

परिणामी याचबरोबर येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस सोसायटीची निवडणूक (India Security Press Society Election) तसेच महापालिकेच्या नाशिकरोड येथील कामगार पतसंस्थेची निवडणूक सुद्धा स्थगित झाल्याने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा व सभासदांचा हिरमोड झाला आहे. आता ही निवडणूक सप्टेंबर महिन्यानंतर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेनंतर नाशिकरोडमध्ये बिझनेस बँक ही महत्त्वाची बँक मानले जाते. या दोन्ही बॅंका सहकार क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. बिजनेस बँकेचे निवडणूक दि. 31 जुलै रोजी होणार होती. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती.

…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

तसेच दि. 18 जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारीच्या काही दिवसापर्यंत चार संचालकांची बिनविरोध निवड झाली होती.

दरम्यान अचानक शासनाने (Government) पूर परिस्थितीचे कारण देऊन निवडणूक स्थगित केली शासनाच्या या निर्णयामुळे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा व सभासदांचा हिरमोड झाला आहे.

मुळात निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असताना निवडणूक स्थगित करणे योग्य नसल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच निवडणुकीची प्रक्रिया ही जवळजवळ 80 टक्के पूर्ण झाली होती.

हा तर कानुनी लोचा…; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

त्यामुळे निवडणूक स्थगित करणे योग्य नव्हते, असेही अनेक सभासदांचे म्हणणे आहे बिजनेस बँकेचे नाशिकरोड नाशिक शहर, देवळाली कॅम्प, भगूर व आजूबाजूच्या परिसरात सुमारे 6 हजार सभासद आहे. आता ही निवडणूक 30 सप्टेंबर नंतरच होणार असल्याने तोपर्यंत नवीन जाहीर होणाऱ्या निवडणुकीच्या तारखेचे सभासदांना वाट बघावी लागणार आहे.

दरम्यान ज्याप्रमाणे बिजनेस बँकेचे निवडणूक स्थगित करण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिकरोडमधील महत्त्वाचा समजला जाणारा इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील प्रेस एम्प्लॉईज सोसायटीची निवडणूक सुद्धा स्थगित करण्यात आली आहे.

प्रेस सोसायटी ही नाशिकरोडमधील महत्त्वाची मानली जाते. नाशिक रोड व करन्सी नोट प्रेस मध्ये सुमारे 4000 प्रेस कामगार आहे. या प्रेस कामगारांची ही सोसायटी असून या सोसायटीची भव्य असे इमारत सिक्युरिटी प्रेसच्या परिसरात आहे. सिक्युरिटी प्रेस सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा घोषित करण्यात आला होता. ही निवडणूक येत्या सात ऑगस्ट रोजी होणार होती. परंतु आता ही निवडणूक सुद्धा स्थगित झाल्यामुळे प्रेस कामगारांचा हिरमोड झाला आहे.

उद्योजकाने उचलले टोकाचे पाऊल; पत्नी, मुलासह पेटवली कार

त्याचप्रमाणे महापालिकेच्या नाशिकरोड येथील कामगार पतसंस्थेचे सुद्धा निवडणूक घोषित करण्यात आली होती. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्याचप्रमाणे निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराने प्रचाराला सुरुवात केली होती. ही निवडणूक येत्या रविवार (दि. 24) जुलै रोजी होणार होती. परंतु ही निवडणूक सुद्धा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

एकंदरीत बघता नाशिकरोड परिसरातील या तीन महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने सर्वच इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या