Friday, April 26, 2024
Homeनगरपुणे, नाशिकसह ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात; प्रवासी व पालकांची मागणी

पुणे, नाशिकसह ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात; प्रवासी व पालकांची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर आगारातून श्रीरामपूर-पुणे, श्रीरामपूर-नाशिकसह ग्रामीण भागातील बसेस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी व पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन येथील आगार व्यवस्थापकांना नुकतेच देण्यात आले आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर आगारातून श्रीरामपूर पुणे मार्गावरील 1 वाजता सुटणारी श्रीरामपूर-नगर-पुणे, 2) 6.45 ची पुणे-श्रीरामपूर, 2 वाजताची श्रीरामपूर-नगर-पुणे, रात्री 8 ची पुण- नगर-श्रीरामपूर, दुपारी तीनची श्रीरामपूर-पुणे -श्रीरामपूर, 3.15 वा.ची श्रीरामपूर-नाशिक, 6.45 ची नाशिक-श्रीरामपूर, 5 वाजताची श्रीरामपूर-पुणे तसेच ग्रामिण भागातील गाड्या पूर्ववत चालू कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर, पुणे, शिरूर व नाशिक, सिन्नर ही शहरे औद्योगिक वसाहतीचे केंद्र असून श्रीरामपूर येथून मोठ्या प्रमाणात कामगार व विद्यार्थी, व्यापारी या मार्गावरुन प्रवास करीत असतात. महामंडळाचे चुकीचे नियोजनामुळे सदरच्या गाड्या बंद झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवासांचे प्रचंड हाल होत आहेत. महामंडळाकडे डिझेलचा साठा पुरेसा नसल्यामुळे आगारातून एकही बस अनेकदा वेळेवर धावत नाहीत.

आगारात चौकशी केली असता, श्रीरामपूर-भुसावळ, श्रीरामपूर-यावल, श्रीरामपूर-रावेर, श्रीरामपूर -इन्दोर, अशा नवीन बसेस सुरु केलेल्या आहेत, असे सांगण्यात येते. ज्या मार्गावर गाड्यांची आवश्यकता आहे त्या मार्गावर गाड्या न पाठवता, आगारातून मर्जीप्रमाणे गाड्या पाठविण्यात येत असून श्रीरामपूर, पुणे, नाशिक मार्गावरील प्रवाशांना सदरच्या ठिकाणी गाड्या न मिळाल्यामुळे खाजगी गाड्यांतून नाईलाजास्तव प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचे अतिशय हाल होतात.

येत्या आठ दिवसांत या गाड्या सुरू कराव्यात, अन्यथा आगारासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती आमदार लहु कानडे, महामंडळाचे विभाग नियंत्रक, व्यवस्थापकीय संचालक, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षक, यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर उपनगराध्यक्ष करण ससाणे, अशोक बागुल,एल. जे. मोहन, चरण त्रिभुवन, प्रकाश खैरे, सुभाष तोरणे, बंटी गुरुवाडा, कैलास लोखंडे, भरत कोठारी, विजय खाजेकर, दीपक गंगवाल, प्रदीप वाघ, महावीर पाटणी यांच्यासह प्रवासी व पालकांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या