Thursday, April 25, 2024
Homeनगरबसस्थानकावरून सोन्याचे नेकलेस चोरणार्‍या महिलेस अटक

बसस्थानकावरून सोन्याचे नेकलेस चोरणार्‍या महिलेस अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

येथील नवीन बसस्थानकावरून 26 फेब्रुवारी रोजी सकाळी पुण्याला जाणार्‍या बसमध्ये चढतांना मिरा अरविंद घोडके (वय- 47, रा. पागोरी पिंपळगाव) या महिलेच्या पर्समधील सुमारे अकरा ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस चोरी करणार्‍या माया कल्याण भोसले (रा. हातगाव, ता. शेवगाव) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी नवीन बसस्टॅड या ठिकाणी जाऊन येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे फुटेज तपासले. त्यामध्ये माया कल्याण भोसले त्या ठिकाणी चोरी करताना संशयितरित्या आढळून आली. पोलिसांना माहितीनुसार या चोरीच्या गुन्हातील महिला माया भोसले ही तिच्या राहत्या घरी (हातगाव ता.शेवगाव येथे) असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला तिथून ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणून अटक केली.

पाथर्डी शहरातील जुन्या व नवीन बस स्टँड येथे अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले असून यातील संशयित आरोपी माया भोसले हिने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहे काय? गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, कृष्णा बडे, ज्ञानेश्वर रसाळ, नारायण कुटे, मनिषा वारे यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या