Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

नंदुरबार ।Nandurbar। प्रतिनिधी

शहरातील आमदार कार्यालयाजवळील (MLA’s office) वीज वितरणच्या ट्रांसफार्मरवरील (transformer) केबलचे जबरदस्त स्पार्किंग होऊन अचानक आगीचे मोठ्ठे लोळ उठले. हे स्पार्किंग (Sparkling) एवढे जबरदस्त होते की दिवाळीचे बॉम्ब फुटावे तसे मोठे आवाज करीत सर्व दिशेने मोठ्या ठिणग्या पडत होत्या. होणारा आवाज आणि भयावह दृष्य पाहून त्याप्रसंगी रस्त्याने जाणारे देखील काही क्षण हादरून गेले . काही मिनिटे खाली स्पार्किंग झाले नंतर ट्रांसफार्मरच्या भोवताली आणि थेट दुसर्‍या पोलपर्यंत तडतडाट करीत वीजांचं तांडव चालावे तसे स्पार्किंग होत अखेरीस मोठा आवाज करून तेथील वीजपुरवठा खंडित (Power outage) झाला. त्यामुळे परिसरात अंधकार पसरला होता.

- Advertisement -

शहरातील आमदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर काल रात्रीच्या सुमारास अचानक स्पार्कींग सुरु झाली. हे स्पार्किंग एवढे जबरदस्त होते की जणू काही फटाक्यांची आतीषबाजीच होती. स्पार्किंग होता होता ट्रान्स्फॉर्मरने पेटे घेतला. यात ट्रान्स्फॉर्मर पूर्णपणे जळून खाक झाले. या ट्रान्सफॉर्मरजवळच लाखो रुपये किमतीची कार उभी होती. सुदैवाने या कारवर ठिणग्या पडल्या नाही. अन्यथा मोठया प्रमाणावर हानी झाली होती. वाहतुकीच्या रस्त्यालगतच हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी नेहमी चारचाकी व दुचाकी असतात. बाजारहाट करणार्‍यांपैकी तसेच त्या परिसरातील कार्यालयांमधील ये – जा करणार्‍यांपैकी अनेक जण तिथून वावरत असतात. यामुळे हे स्पार्किंग दिवसा घडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत होवून अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, तिथून जवळच उभी असलेली कार पेटून अथवा ट्रांसफार्मर पेटून मोठ्ठा स्फोट झाला असता तर भली मोठी आग लागण्याचा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. परंतु सुदैवाने असा कोणताही अनर्थ घडलेला नाही. दरम्यान, महावितरणच्या अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी वेळीच दखल घेऊन तातडीने दुरुस्त्या करीत अत्यंत तत्परतेने त्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करून दिला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी याविषयी सांगितले की ट्रांसफार्मरला कोणताही धक्का बसलेला नाही . पाऊस पडल्यामुळे अशा घटना घडत असतात. एल टी वायर स्पार्किंग होऊन जळून खाक झाली आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही नुकसान नसून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे, असेही मनिषा कोठारी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या